कोल्हापूर : मंगळवार पेठेत डेंग्यूचे चार संशयित, तीन दिवसांत शहरात आठ रुग्ण : डेंग्यू पाठ सोडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:40 PM2018-11-05T13:40:34+5:302018-11-05T13:41:38+5:30

गेल्या पाच महिन्यांपासून शहरात डेंग्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १३३३, तर तीन दिवसांत डेंग्यूचे संशयित आठ रुग्ण आहेत. सध्या मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली, सणगर गल्ली यांसह गेल्या आठवड्यात मंगेशकरनगर येथील एका कुटुंबातील डेंग्यूसंशयित पाच रुग्ण होते.

Kolhapur: Four suspected dengue patients in Peth, eight days in city: dengue drops | कोल्हापूर : मंगळवार पेठेत डेंग्यूचे चार संशयित, तीन दिवसांत शहरात आठ रुग्ण : डेंग्यू पाठ सोडेना

कोल्हापूर : मंगळवार पेठेत डेंग्यूचे चार संशयित, तीन दिवसांत शहरात आठ रुग्ण : डेंग्यू पाठ सोडेना

Next
ठळक मुद्देमंगळवार पेठेत डेंग्यूचे चार संशयिततीन दिवसांत शहरात आठ रुग्ण : डेंग्यू पाठ सोडेना

कोल्हापूर : गेल्या पाच महिन्यांपासून शहरात डेंग्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १३३३, तर तीन दिवसांत डेंग्यूचे संशयित आठ रुग्ण आहेत. सध्या मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली, सणगर गल्ली यांसह गेल्या आठवड्यात मंगेशकरनगर येथील एका कुटुंबातील डेंग्यूसंशयित पाच रुग्ण होते.

जूनपासून शहरात या डेंग्यू या आजाराने डोके वर काढले आणि हीच स्थिती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होती. शहरात डेंग्यूसदृश आजाराने पाचहून अधिक जणांचा बळी गेला आहे. क ोल्हापूर महापालिकेच्या रुग्णालयासह ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांमध्येही डेंग्यूचे रुग्ण आहेत.

गुलाब गल्लीमध्ये एका तरुणी तसेच दोन तरुण अशा तिघांना आणि सणगर गल्लीत १५ वर्षांच्या मुलाला डेंग्यूची लागण झाली आहे, असे नागरिकांनी सांगितले. या तीन दिवसांत शहरात आठ, तर ग्रामीण भागात ११ असे एकूण १९ डेंग्यूसंशयित रुग्ण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहेत. यासाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत.

स्वाइन फ्लूचे चार संशयित

कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूने गेल्या दहा महिन्यांत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह (सीपीआर) चार खासगी रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या १६ रुग्णांपैकी चार संशयित रुग्ण शनिवार (दि. ३) अखेर उपचारासाठी दाखल आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Four suspected dengue patients in Peth, eight days in city: dengue drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.