शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Kolhapur Flood: रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी, पुणे-बंगळूर महामार्ग अजूनही बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:47 AM

Kolhapur Flood Update: पुणे-बंगळूर महामार्गावरील कोल्हापूरपर्यंतची वाहतूक आज रविवारीही (दि २५) बंद आहे.. शुक्रवारी सायंकाळपासून ही वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या प्रचंड रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागून राहिल्या आहेत.

- विश्वास पाटीलकोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावरील कोल्हापूरपर्यंतची वाहतूक आज रविवारीही (दि २५) बंद आहे.. शुक्रवारी सायंकाळपासून ही वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या प्रचंड रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागून राहिल्या आहेत. कोल्हापूरजवळच्या पुलाची शिरोली जवळ रस्त्यावर अजूनही सुमारे तीन फुटाहून जास्त पाणी आहे. पुराचे पाणी कमी होण्याची गती फार संथ आहे.त्यामुळे आज पूर्ण दिवस आणि रात्रीही पावसाने चांगली विश्रांती दिली तर उद्या सोमवारी (दि २६) सकाळी वाहतूक सुरू होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

पुणे ते बंगळूर महामार्गावर किमान चार ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. त्यातील कराडजवळ मांडनदीचे पाणी मालखेड गावाजवळ रस्त्यावर आलेले पाणी शनिवारी सकाळी उतरले. पण सांगली जिल्ह्यातील कणेगावजवळ, पुढे कोल्हापूरजवळ पुलाची शिरोलीजवळ, कागलवेशीवर आयबीपी पंपावजवळ आणि पुढे कर्नाटकातील यमगर्णी येथे रस्त्यावर आज रविवारीही रस्त्यावर जास्त पाणी आहे. वारणा आणि पंचगंगेच्या पाण्याची पातळी फार संथगतीने कमी होत आहे. शनिवार सकाळपासून पावसाने पूर्ण उसंत दिल्याने सायंकाळपर्यंत पंचगंगा नदीचे पाणी सुमारे अडीच-तीन फुटांनी कमी झाले होते. त्यामुळे रविवारी महामार्ग सुरू होईल अशी शक्यता होती पण ती फोल ठरली.महामार्ग बंद झाल्यावर लोक पुणे, सातारा, कराड येथे शक्य तिथे थांबले आहेत. त्यांना सोमवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा महामार्ग शुक्रवारी (दि २३) सायंकाळी पाच वाजल्यापासून सुमारे ४० तास झाले ठप्प आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरhighwayमहामार्ग