कोल्हापूर : शिरोली पुलाची येथील घराला आग; चार लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:53 IST2019-01-04T16:52:41+5:302019-01-04T16:53:42+5:30

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील लोहार गल्लीतील घराला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे चार लाखांचे साहित्य जळून खाक ...

Kolhapur: A fire in the house of Shiroli Pulchi; Loss of four lakh | कोल्हापूर : शिरोली पुलाची येथील घराला आग; चार लाखांचे नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील लोहार गल्लीमधील घराला गुरुवारी (दि. ३) आग लागली. या आगीत साहित्य जळून खाक झाले.

ठळक मुद्दे शिरोली पुलाचीत घराला आग; चार लाखांचे नुकसानअग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी, आग आटोक्यात

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील लोहार गल्लीतील घराला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे चार लाखांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी (दि. ३) रात्री घडली. हा प्रकार समजताच कावळानाका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी गेले. त्यांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली.

याबाबत अग्निशमन दलाने दिलेली माहिती अशी, की लोहार गल्लीत डॉ. ओंकार उमाकांत पाटील यांचे घर आहे. या घराला गुरुवारी आग लागली. याची वर्दी डॉ. पाटील यांनी दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे प्रभारी स्थानकप्रमुख जयवंत खोत यांच्यासह जवान बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

या आगीत वातानुकूलित यंत्र (ए. सी.), फर्निचर व स्वच्छतागृह जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची शक्यता जवानांनी वर्तविली आहे. अग्निशमन दलाचे चालक गिरीष पोवार, फायरमन आकाश जाधव, कपिल यादव, सुदेश पाटील यांनी ही आग विझविली.
 

 

Web Title: Kolhapur: A fire in the house of Shiroli Pulchi; Loss of four lakh