शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Kolhapur- शक्तिपीठ महामार्ग: १२ जुलै पर्यंत रद्दचा निर्णय घ्या, अन्यथा..; सतेज पाटील यांचा सरकारला इशारा

By राजाराम लोंढे | Updated: June 18, 2024 15:42 IST

कोल्हापुरात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कोल्हापूर : नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज, मंगळवारी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत राज्य सरकारच्या दडपशाही धोरणाला कडाडून विरोध केला. सरकारने १२ जुलै पर्यंत महामार्गाला स्थगिती नव्हे तर रद्दचा निर्णय घ्यावा अन्यथा महामार्ग रोको करु, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस रस्त्यावरुन हलणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला.शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चात जिल्ह्यात शेतकरी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल होते. ‘राज्य सरकारचे करायचे काय?’, ‘खोकेबाज सरकारचा धिक्कार असो’, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी दुपारी साडे बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळेली झालेल्या सभेत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्री, आमदार शक्तीपीठ विरोधातील भूमिका घेत असताना प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांना नोटीसा कशा काढतात? या रस्त्यावर शेतकऱ्यांनी यापुर्वी हरकती नोंदवल्या होत्या, त्याची सुनावणी न घेता दाबून निर्णय घेणार असाल तर ते खपवून घेणार नाही. आंदोलनात फुट पाडण्याचा डाव राज्य सरकारचा असून एखाद्याला ५० लाखांचा धनादेश दिला जाईल, पण त्याला भुलू नका. कोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीन रस्त्यासाठी देणार नाही, याची शपथ घेऊनच येथे घरी जाऊया.खासदार शाहू छत्रपती,  ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, डॉ. भारत पाटणकर, के. पी. पाटील, विजय देवणे, शिवाजी मगदूम, संपत देसाई, गिरीश फोंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

शुक्रवारपर्यंत १०० टक्के हरकती द्यातांत्रीक लढाईत कोठेही मागे पडू नये, यासाठी शुक्रवार (दि. २१) पर्यंत १०० टक्के हरकती गोळा करा. न्याय  व्यवस्थेवर विश्वास आहे, पण आता न्यायालयात न जाता रस्त्यावरच लढाई लढायची असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.तर कागलची जनता राजकारणावर बुलडोझर फिरवेलउद्धवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही टार्गेट केले. महामार्ग कागलमधून जातो, याचे भान ठेवा, अन्यथा तुमच्या राजकारणावर बुलडोझर फिरवल्याशिवाय कागलची जनता गप्प बसणार नसल्याचा इशाराही दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गagitationआंदोलनFarmerशेतकरीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील