शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोल्हापूर : शेवटचा हात मारण्याचा ‘स्थायी’त प्रयत्न, सभेपुढे १०७ कोटींच्या जलवाहिनीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 11:22 AM

महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपद रिक्त असताना आणि नवीन सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली असताना जाता-जाता शहरांंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे १०७ कोटी खर्चाचे काम मंजूर करण्याच्या प्रयत्न स्थायी समिती सदस्यांसह काही प्रमुख कारभाऱ्यांनी सुरू केला आहे.

ठळक मुद्देशेवटचा हात मारण्याचा ‘स्थायी’त प्रयत्नसभेपुढे १०७ कोटींच्या जलवाहिनीचा प्रस्ताव

कोल्हापूर : महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपद रिक्त असताना आणि नवीन सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली असताना जाता-जाता शहरांंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे १०७ कोटी खर्चाचे काम मंजूर करण्याच्या प्रयत्न स्थायी समिती सदस्यांसह काही प्रमुख कारभाऱ्यांनी सुरू केला आहे.

शुक्रवारी स्थायीची सभा असल्याने ठेकेदाराकडून निगोशिएशन करून तसेच त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मंजुरी आणून हा प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलावर ठेवण्याची किमया बुधवारी एका दिवसात करण्यात आल्याची चर्चा आहे.राज्य सरकारकडून अमृत योजनेद्वारे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास शहरातील विविध भागांतील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याकरिता १०७ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्याकरीता मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून प्रशासनाने निविदा मागविण्यात आल्या होत्या.

ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा स्थायी समिती सदस्यांचा तसेच काही कारभारी नगरसेवकांचा प्रयत्न होता; परंतु प्रत्यक्षात ‘आॅफ शोअर’ नावाच्या ठेकेदाराने ही निविदा १७.५० टक्के जादा दराने भरली. त्यामुळे कारभाऱ्यांच्या प्रयत्नांना खिळ बसते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सभापती संदीप नेजदार यांची मुदतही ३१ जानेवारीस संपली आणि नवीन सभापती निवड प्रक्रिया सुरू झाली.नवीन सभापती निवड होण्यापूर्वीच हे काम मंजूर करण्याचा प्रयत्न काही ‘कारभाऱ्यां’नी सुरू केला. बुधवारी ठेकेदाराशी निगोशिएशन झाल्यानंतर हे काम ११.९० इतक्या जादा दराने काम करण्यास मान्यता मिळविण्याकरिता प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिककरणाकडे पाठविण्यात आला. विशेष म्हणजे या प्रस्तावास प्राधिकरणानेही एका दिवसात मान्यताही दिली. आता हा प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलावर ठेवण्यात आला आहे. आायुक्तांच्या सहीने तो स्थायी समितीच्या सभेत मंजुरीकरिता येईल.स्थायी समितीचे सभापतिपद जरी रिक्त असले तरी समितीची सभा घेता येते या कायद्यातील तरतुदीचा आधार घेण्यात येत असून शुक्रवारी होणाऱ्या सभेपुढे हा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थितांपैकी एकाची ‘चेअरमन फॉर द मिटिंग’ म्हणून निवड केली जाईल आणि हा प्रस्ताव मंजूर केला जाईल.

सभा घेणे, प्रस्ताव मंजूर करणे या गोष्टी नियमांनुसार असल्या तरी नवीन सभापतींना लाभाची संधी नको म्हणून तो घाईगडबडीने मंजूर करण्याचा कारभाऱ्यांचा आटापिटा चर्चेचा विषय ठरला आहे.

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षआयुक्त प्रत्येक फाईल, प्रस्ताव निरखून पाहतात. त्यातील त्रुटी काढतात. त्यामध्ये दुरूस्ती सुचवितात. त्यांना पाहिजे तसा प्रस्ताव देण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे १०७ कोटींचा हा प्रस्ताव बारकाईने पाहतात की तो तसाच घाईगडबडीने देतात हे या दोन दिवसांत पाहायला मिळेल.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर