शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

कोल्हापूर :  रिव्हॉल्व्हरचा धाक; तिघे लुटारू ताब्यात, दुचाकीसह एअरगन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 3:53 PM

राजारामपुरीच्या आठव्या गल्लीमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वृद्धाला लुटणाऱ्या शिये (ता. करवीर) येथील तिघा लुटारूंना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व एअरगन जप्त केली.

ठळक मुद्देरिव्हॉल्व्हरचा धाक; तिघे लुटारू ताब्यातदुचाकीसह एअरगन जप्त

कोल्हापूर : राजारामपुरीच्या आठव्या गल्लीमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वृद्धाला लुटणाऱ्या शिये (ता. करवीर) येथील तिघा लुटारूंना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व एअरगन जप्त केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी  दिली.संजय प्रल्हाद गुरव (वय ५८, रा. कुपेकर गल्ली, मंगळवार पेठ) हे राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. २० जुलै रोजी दुपारी जेवण करून ते शतपावलीसाठी कार्यालयातून बाहेर चालत राजारामपुरी आठवी गल्ली येथे गेले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी त्यांना अडवून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली होती.

येथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघेही चोरटे कॅमेराबद्ध झाले होते. तिघेही २० ते २७ वयोगटातील असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शिये येथील तिघांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णन मिळतेजुळते असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्याजवळ रिव्हॉल्व्हर नव्हे तर लहान एअरगन मिळून आली.

गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. तिघेही शिये एम. आय. डी. सी. येथे खासगी कारखान्यात काम करतात. तिघांनाही दारूचे व्यसन आहे. ते सराईत नाहीत. त्यांनी लूटमारीचा पहिलाच प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर