शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

कोल्हापूर : कुलगुरूंकडून गैरव्यवहारांचे प्रमाद, आर्थिक उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:03 PM

निष्क्रियता, गैरव्यवहारांचे असंख्य प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, अधिकार मंडळांवर अतिक्रमण असे विविध आरोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने केले आहेत. कुलगुरूंच्या प्रमादांची, गैर व भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ‘सुटा’ने आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देकुलगुरूंकडून गैरव्यवहारांचे प्रमाद, आर्थिक उधळपट्टीशिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे आंदोलन सुरूबेकायदेशीर कारभाराच्या चौकशीची मागणी

कोल्हापूर : निष्क्रियता, गैरव्यवहारांचे असंख्य प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, अधिकार मंडळांवर अतिक्रमण असे विविध आरोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने केले आहेत. कुलगुरूंच्या प्रमादांची, गैर व भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ‘सुटा’ने आंदोलन सुरू केले.‘सुटा’च्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कुलगुरूंच्या दोन वर्षांतील गैर, भ्रष्ट व बेकायदेशीर, नियमबाह्य कारभाराची सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या कारभाराची सुमारे ८० प्रकरणे असून, त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या गैरव्यवहारांबाबत कुलगुरूंना ‘सुटा’ने अनेक पत्रे, निवेदने दिली. त्यांच्यासमवेत ‘सुटा’च्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा चर्चा केली; परंतु, कुलगुरूंच्या कारभारात सुधारणा होण्याऐवजी गैरव्यवहारांचे प्रमाण वाढले. अनेक गैर प्रकरणांबाबत कारवाईचे आश्वासन देऊनही ती करण्यात आली नाही.

गैरव्यवहार झाल्याचे मान्य करूनही अपेक्षित कारवाई करण्याबाबत कुलगुरूंची निष्क्रियता, उदासीनता स्पष्ट झाली. गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कुलगुरूंसमवेत ‘सुटा’च्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यावेळी आंदोलनाबाबत अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला होता. त्यावेळी कुलगुरूंनी कारवाईचे कोणतेही आश्वासन दिले नाही; त्यामुळे ‘सुटा’ला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला. त्यानुसार आंदोलन सुरू केले आहे.

पहिल्या टप्प्यात प्राध्यापकांच्या सह्यांची मोहीम राबवून कुलपतींना निवेदन देण्यात येणार आहे. कुलगुरूंच्या कारभाराची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. विद्यापीठाचे झालेले आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली जाणार आहे, अशी माहिती ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, याबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

‘सुटा’ने कुलगुरूंचे मांडलेले ठळक प्रमाद

  1. गैरव्यवहारांचे आरोप असलेल्या प्राचार्यांची वर्णी
  2. अभ्यासमंडळांवर अपात्र प्राध्यापकांचे नामनिर्देशन
  3. सदोष पदवी प्रमाणपत्रांची छपाई प्रकरण
  4. शैक्षणिक सल्लागाराची नियमित कार्यपद्धती धाब्यावर बसवून बेकायदेशीर नेमणूक
  5. कुलगुरू निवासात स्वतंत्र कार्यालयाची नियमबाह्य, मनमानी स्थापना
  6. वार्षिक अंदाजपत्रकाबाबत तरतुदींचा भंग
  7. स्वत:ची, कुलगुरुपदाची अप्रतिष्ठा
  8. ‘सुटा’ने उपस्थित केलेले प्रश्न, प्रकरणांबाबत चुकीचा, अपूर्ण खुलासा
  9. प्राचार्यांच्या निवडीस मान्यता देण्याबाबत पक्षपात करणे
  10.  स्वत:चे प्रोफाईल समृद्ध करण्यावर भर
  11. अभ्यासमंडळांवरील स्वीकृत सदस्यांचा घोळ.

आंदोलनाचे टप्पे

  1. २२ जानेवारी :  महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून काम
  2. २९ जानेवारी  : दुपारी तीन वाजताविद्यापीठासमोर निदर्शने  
  3. १२ फेब्रुवारी  : दुपारी एक वाजता.विद्यापीठात धरणे आंदोलन

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर