कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक , ‘त्या’ मद्यपी कार चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:02 IST2018-04-28T13:02:14+5:302018-04-28T13:02:14+5:30

उमा टॉकीज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रोडवर मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक देणाऱ्या कारचालकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सुभाष बाबासो रोहिदास (वय ३७, रा. निगवे खालसा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.

Kolhapur: A drunkard in a drunken state | कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक , ‘त्या’ मद्यपी कार चालकावर गुन्हा

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक , ‘त्या’ मद्यपी कार चालकावर गुन्हा

ठळक मुद्देमद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक ‘त्या’ मद्यपी कार चालकावर गुन्हा

कोल्हापूर : उमा टॉकीज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रोडवर मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक देणाऱ्या कारचालकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयित सुभाष बाबासो रोहिदास (वय ३७, रा. निगवे खालसा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. मोपेडचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झालेने सुप्रिया सुरेश नायर (वय ४७, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली.

अधिक माहिती अशी, सुभाष रोहिदास हा शुक्रवारी रात्री कारमधून उमा टॉकीज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगरमार्गे गावी जात असताना गोखले कॉलेज-महालक्ष्मीनगर येथे येताच तो मोपेडला धडक देऊन भरधाव निघून गेला होता.

यावेळी मोपेडवरील सुप्रिया नायर यांना दूखापत झाली नाही, मात्र त्यांच्या मोपेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रोहिदास हा हॉकी स्टेडियमसमोर नागरिकांना मिळून आला. त्याचेवर निष्काळजीपणे, अविचाराने कार चालविणे, महिलेला शिवीगाळ करणे आदी कलमाद्वारे गुन्हा दाखल केला. रोहिदास याचेवर गडहिंग्लज, करवीर पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: A drunkard in a drunken state