शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षांनाच नको ‘हात’, प्रकाश आवाडे लढणार अपक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 12:10 PM

काँग्रेसबध्दल सर्वसामान्यांच्या मनांत नाराजीची भावना असली तरी आता चक्क कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षांनाच पक्षाचे ‘हात’ हे चिन्ह नको झाले आहे. त्यामुळे ते यावेळेची विधानसभा निवडणूक चक्क अपक्ष म्हणून लढवणार आहेत.

ठळक मुद्दे काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षांनाच नको ‘हात’, प्रकाश आवाडे लढणार अपक्षसायंकाळी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

विश्र्वास पाटील कोल्हापूर : काँग्रेसबध्दल सर्वसामान्यांच्या मनांत नाराजीची भावना असली तरी आता चक्क कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षांनाच पक्षाचे ‘हात’ हे चिन्ह नको झाले आहे. त्यामुळे ते यावेळेची विधानसभा निवडणूक चक्क अपक्ष म्हणून लढवणार आहेत.

आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्याची घोषणा करण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, त्यांचे वडिल ज्येष्ठ काँग्रेस नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, व जिल्हा परिषदत सदस्य राहूल आवाडे यांची येथील कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे.

प्रकाश आवाडे हे सायंकाळी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. सात महिने ते ही जबाबदारी सांभाळत होते. जिल्हा परिषदेत आवाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडी भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. त्यांच्याकडे महिला व बालकल्याण सभापतीपद आहे.प्रकाश आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून मागच्या दोन्ही विधानसभा निवडणूकीमध्ये हात या चिन्हांवर पराभूत झाले.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा दारुण पराभव झाला. आवाडे यांची तिसरी पिढी राहूल आवाडे हे मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून ताराराणी विकास आघाडी करून विजयी झाले.

प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. इचलकरंजी मतदारसंघातून १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी त्यांची निवड झाली.प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधि या नात्याने राजकरणात वेगळा ठसा उमटविला आहे. ते १९८८ ते १९९० मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री होते. सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री आणि नंतरच्या काळात कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री या नात्याने त्यांनी वस्त्रोद्योगासाठी मौलिक कार्य केले आहे.

त्यांचे वडिल कल्लाप्पाण्णा आवाडेकडून प्रकाशरावांना राजकीय वारसा मिळाला. राजकीय पद असो किंवा नसो जनतेची सेवा हाच खरा धर्म अशी शिकवण त्यांना मिळाली व त्यामुळेच अनेक कार्यातून लोकांच्या उन्नतीसाठी अविरत झटणारे समर्पित व्यक्तिमत्व म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जातात.

राजकीय टप्पे

  • इचलकरंजी मतदारसंघातून १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.
  • १९८८-९० महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री
  • १९९५ मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून विधानसभेवर पुन्हा निवड.
  •  १९९९ मधील निवडणूकीत इचलकरंजी मतदारसंघातून पुन्हा निवड व महाराष्ट्रच्या मंत्रीमंडळात वस्त्रउद्योग,आदिवासी विकास व विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून समावेश.
  • २००४ मध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 
  • जानेवारी २००३ पासून वस्त्रउद्योग राज्यमंत्रीपदाबरोबर जालना जिल्हयाचे पालकमंत्री पदाची जबाबदारी.
  • जुलै २००४ पासून कॅबिनेटपदी बढती मिळून वस्त्रउद्योग व माजी सैनिकांचे कल्याण मंत्री म्हणून कार्यभार तसेच सिंधूदुर्ग जिल्हा पालकमंत्रीपदाची धुरा. 

आवाडे यांना जिल्हाध्यक्षपद देण्यास काँग्रेसमधीलच नेते पी.एन.पाटील यांचा टोकाचा विरोध होता. परंतू पक्षाकडूनच अध्यक्ष बदल करण्याचे आदेश आले. त्यामुळे पी. एन. पाटील यांना राज्य उपाध्यक्ष पद दिले. आवाडे यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेवून कसेबसे सात महिनेच झाली आहेत. तोपर्यंत त्यांनी पक्षाला फाट्यावर मारून स्वतंत्र लढण्याचा पवित्रा घेतल्याने काँग्रेसमधूनच अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटली आहे.

आवाडे घराणे गेली पन्नास वर्षे काँग्रेसमध्ये आहे. गेली अनेक वर्षे कोल्हापुरातील रखडलेले काँग्रेस भवन कल्लाप्पाणा आवाडे यांनी पुढाकार घेवून पूर्ण केले व त्याचे उदघाटन रविवारीच पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाले.

खर्गे यांनी काँग्रेस नेत्यांना एकीने लढा असे आवाहन केले. त्यावेळीही प्रकाश आवाडे यांनी सर्वांनी एकीने लढल्यास काँग्रेसला सुवर्णकाळ येईल असे मोठे भाषण केले होते. त्यानंतर चौथ्या दिवशीच त्यांनी ही उलटी भूमिका घेतली आहे.

सुरेश हाळवणकर यांच्याविरोधात प्रकाश आवाडे

इचलकरंजीत आता भाजपचे सुरेश हाळवणकर यांच्याविरोधात प्रकाश आवाडे यांच्याशी लढत आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत इचलकरंजी मतदार संघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांना तब्बल ७४ हजारांचे मताधिक्क्य आहे. त्यामुळे तिथे हात चिन्हांवर आपण लढलो तर निवडून येवू शकत नाही अशी त्यांची मानसिकता झाली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूरSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर