कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचार न करण्याची शपथ, दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 14:00 IST2018-10-30T13:56:00+5:302018-10-30T14:00:07+5:30
भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी भ्रष्टाचार न करण्याची शपथ सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. सोमवार (दि. २९) ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन झाला. यावेळी अरविंद लाटकर, नंदकुमार काटकर, गिरीष गोडे, मारुती पाटील, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी भ्रष्टाचार न करण्याची शपथ सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. सोमवार (दि. २९) ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहल भोसले, पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, तहसीलदार सविता लष्करे, स्नेहल मुळे-भांमरे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे, आदी प्रमुख उपस्थित होते.
या सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी उपस्थित महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार न करण्याची शपथ देऊन केली. प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शकता आणण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, असे आवाहन करत राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.