कोल्हापूर जिल्हा बँक राबविणार "आई" महिला पर्यटन धोरण, १५ लाखांपर्यंत कर्जाचा मिळणार व्याज परतावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:00 IST2026-03-03T16:00:02+5:302026-03-03T16:00:21+5:30

कोणत्या व्यवसायासाठी महिला कर्ज मिळणार....जाणून घ्या

Kolhapur District Central Cooperative Bank will implement Maharashtra Government's Aai Women Tourism Policy Interest refund on loans up to Rs 15 lakh | कोल्हापूर जिल्हा बँक राबविणार "आई" महिला पर्यटन धोरण, १५ लाखांपर्यंत कर्जाचा मिळणार व्याज परतावा 

कोल्हापूर जिल्हा बँक राबविणार "आई" महिला पर्यटन धोरण, १५ लाखांपर्यंत कर्जाचा मिळणार व्याज परतावा 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्र शासनाचे "आई" हे महिलापर्यटन धोरण राबविणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. पर्यटन व्यवसायातील पंधरा लाखांपर्यंत कर्जाचा व्याज परतावाही पर्यटन संचालनालयाकडून दिला जाणार आहे.

या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला जिल्ह्यातील असणे आवश्यक. लाभार्थीचे बँक खाते आधार लिंक असावे. संबंधित पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असावा. व्यवसायात ५० टक्के व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक. महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालनालयाकडून पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल. त्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे. व्यवसाय सुरू झाल्याच्या फोटोसह कर्जाची नियमित परतफेड करणे आवश्यक राहणार आहे.

या व्यवसायासाठी महिला कर्ज मिळणार....

  • कॅरॅमॅन : राहण्यासाठी व प्रवासासाठी सुसज्ज फिरते वाहन
  • टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी : प्रवास, निवास व संपूर्ण टूर पॅकेज सेवा पुरवणारी संस्था.
  • कृषी पर्यटन केंद्र : शेती व ग्रामीण जीवनाचे अनुभव देणारी पर्यटन स्थळे.
  • होम स्टे- ग्रामीण होम स्टे, शहरी होम स्टे, थीम असलेले होम स्टे, होम स्टेचे नूतनीकरण
  • रेस्टॉरंट : जेवणासाठी पूर्ण सेवा देणारे ठिकाण
  • आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज : स्थानिक कला, वस्तू व हस्तकलेचे दर्शन व विक्रीचे ठिकाण

राज्य सरकारचे महिला केंद्रित असे महिला पर्यटन धोरण जिल्हा बँकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाच्या माध्यमातून महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग आणि त्यांच्या आर्थिक विकासाचा स्तरही उंचावेल. या धोरणाच्या माध्यमातून केडीसीसी बँक जिल्ह्यातील महिलांना नवीन उद्योगाकरीता व जुना व्यवसाय वाढविण्याकरिता प्राधान्य देणार आहे. - हसन मुश्रीफ (अध्यक्ष जिल्हा बँक)

Web Title : कोल्हापुर बैंक महिला पर्यटन नीति लागू करेगी, ऋण ब्याज पर देगी छूट

Web Summary : कोल्हापुर जिला बैंक "आई" महिला पर्यटन नीति लागू करेगी, महिला उद्यमिता का समर्थन करेगी। महिलाओं के स्वामित्व वाले पर्यटन व्यवसायों के लिए ₹15 लाख तक के ऋण पर्यटन निदेशालय से ब्याज छूट के लिए पात्र हैं, जिससे आर्थिक सशक्तिकरण को बढ़ावा मिलेगा।

Web Title : Kolhapur Bank to Implement Women's Tourism Policy, Offers Loan Interest Refunds

Web Summary : Kolhapur District Bank will implement the "Aai" women's tourism policy, supporting female entrepreneurship. Loans up to ₹15 lakhs for tourism businesses owned and operated by women are eligible for interest refunds from the Directorate of Tourism, fostering economic empowerment.