कोल्हापूर : धूम स्टाईलने महिलेचे गंठण लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:07 IST2018-05-04T13:07:16+5:302018-05-04T13:07:16+5:30

भाजी खरेदी करुन घरी चालत जात असताना पाठिमागुन दूचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसडा मारुन हातोहात लंपास केले.

Kolhapur: Dhoot Styles Women's Clutches Lampas | कोल्हापूर : धूम स्टाईलने महिलेचे गंठण लंपास

कोल्हापूर : धूम स्टाईलने महिलेचे गंठण लंपास

ठळक मुद्दे धूम स्टाईलने महिलेचे गंठण लंपासनाकाबंदी करुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : भाजी खरेदी करुन घरी चालत जात असताना पाठिमागुन दूचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसडा मारुन हातोहात लंपास केले.

गुरुवारी (दि. ३) सायंकाळी पाचच्या सुमारास सम्राटनगर रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी पद्मजा सुरेश भोसले (वय ४०, रा. साई प्लाझा, सम्राटनगर) यांनी राजारामपूरी पोलीसांत फिर्याद दिली.

पोलीसांनी शहरात नाकाबंदी करुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळुन आले नाहीत. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा शोध घेत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Dhoot Styles Women's Clutches Lampas