कोल्हापूर:राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात अज्ञात तरुणाचा मृतदेह; डोक्यात वार सदृश्य खुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 10:35 IST2023-06-01T10:34:30+5:302023-06-01T10:35:17+5:30

कागल निढोरी राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह रात्री टाकण्यात आला आहे.

Kolhapur: Dead body of an unidentified youth in a field in Bamani area on the state road; Marks resembling a blow to the head | कोल्हापूर:राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात अज्ञात तरुणाचा मृतदेह; डोक्यात वार सदृश्य खुणा

कोल्हापूर:राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात अज्ञात तरुणाचा मृतदेह; डोक्यात वार सदृश्य खुणा

सिध्दनेर्ली: कागल- निढोरी राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात एका अज्ञात तरुणाचा  मृतदेह रात्री टाकण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

मृत युवकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून अमरसिंह दत्ताजीराव थोरात (वय 30 )असे मृताचे नाव आहे. वाळवा तालुक्यातील गोटखिंडे गावातील हा तरुण आहे. तो कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात शिकत होता. मात्र, या खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

 याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अंदाजे ५० वर्ष वयाच्या या तरुणाच्या डोक्यात वार सदृश्य खुणा आहेत. या तरुणास इतरत्र ठिकाणी मारून या ठिकाणी मृतदेह आणून टाकला असणेची शक्यता आहे. अशी घटनास्थळी चर्चा सुरू आहे. 

सकाळी हा मृतदेह पाहून  गावातील महिलेने पोलीस पाटील महादेव कुंभार यांना माहिती दिली. कागल पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. पंचनामा सुरू असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती.

Web Title: Kolhapur: Dead body of an unidentified youth in a field in Bamani area on the state road; Marks resembling a blow to the head