कोल्हापूर :  दौलतनगरमध्ये महिलेला ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:32 IST2018-11-02T19:30:27+5:302018-11-02T19:32:01+5:30

राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची साक्ष न्यायालयात देऊ नये यासाठी चौघाजणांनी महिलेच्या घरात घुसून सत्तूर उगारून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार गौरव अशोक भालकर, जया डंग (दोघे रा. सम्राटनगर) यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १) गुन्हा दाखल झाला.

Kolhapur: Daulatnagar threatens to kill woman | कोल्हापूर :  दौलतनगरमध्ये महिलेला ठार मारण्याची धमकी

कोल्हापूर :  दौलतनगरमध्ये महिलेला ठार मारण्याची धमकी

ठळक मुद्देदौलतनगरमध्ये महिलेला ठार मारण्याची धमकीन्यायालयात साक्ष देऊ नये, गुंड गौरव भालकरसह चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची साक्ष न्यायालयात देऊ नये यासाठी चौघाजणांनी महिलेच्या घरात घुसून सत्तूर उगारून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार गौरव अशोक भालकर, जया डंग (दोघे रा. सम्राटनगर) यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १) गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी, जयश्री संजय पाटील (वय ३८, रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर) यांनी गुंड भालकर यांच्याविरोधात सहा महिन्यांपूर्वी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्याचा राग भालकरला आहे. त्यातून त्याने गुरुवारी पाटील यांच्या घरात घुसून ‘मी आता कारागृहातून सुटून आलो आहे. माझ्या विरोधात न्यायालयात साक्ष द्यायची नाही,’ असे धमकावून सत्तूर उगारून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Daulatnagar threatens to kill woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.