कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:19 IST2025-12-19T10:05:48+5:302025-12-19T10:19:02+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलानेच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
हुपरी: कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलानेच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचे समोर आले. आज पहाटे पाचच्या सुमारास ही हत्या करण्यात आली, हत्या केल्यानंतर संशयीत स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपीचे नाव सुनिल नारायण भोसले (४८) असे आहे. तर मृत्यू झालेल्यांची नावे विजयमाला नारायण भोसले (७०) आणि नारायण गणपतराव भोसले (७८) अशी आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
मिळालेल्या माहितीनुसार, पोटच्या पोराने जन्मदात्याचा घात केला व पोलिस ठाण्यात हजर झाला. हुपरी शहरात खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपीने आधी आईच्या हाताच्या नसा कापल्या. तसेच चेहऱ्यावरही वार केले. यावेळी पुढच्या खोलीत असलेल्या वडीलांना हा प्रकार लक्षात आला नाही. आई कुठे आहेरे म्हणून विचारणा केली असता मागे आहे. जा म्हणून सांगत वडिलांना पाठीमागून डोक्यात काठीने हल्ला केला. हाताच्या शिरा कापून टाकल्या.
या गंभीर घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळावर नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिस प्रशासनासह मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाल्या असून पुढील तपासणी सुरू केली आहे.