शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कऱ्हाडमधील गुन्हेगारांचे कोल्हापूर कनेकशन: पोलिसांकडून शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 2:25 PM

सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या फलटण-कऱ्हाड येथील सहा सराईत गुंडांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांचा कोल्हापुरात येण्यामागचा उद्देश नेमका काय होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

ठळक मुद्देकऱ्हाडमधील गुन्हेगारांचे कोल्हापूर कनेकशन: पोलिसांकडून शोध सुरुकोल्हापूर शहरातील कुप्रसिद्ध टोळीच्या म्होरक्यांचा समावेश

कोल्हापूर : सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या फलटण-कऱ्हाड येथील सहा सराईत गुंडांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांचा कोल्हापुरात येण्यामागचा उद्देश नेमका काय होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

जवाहरनगरातील स्वयंघोषित ‘डॉन’ समजणारा सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारांसह जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर बुधवारी दिवसभर थांबून होता. तो पोलीस आणि इतर गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला दोन दिवस चौकशीसाठी ठेवून घेतले होते.

नुकताच कारागृहातून तो बाहेर पडला आहे. गुन्हेगारी साम्राज्यामध्ये आपली छबी निर्माण करण्यासाठी त्याची उठाठेव सुरू आहे. त्यासाठी त्याने काही पोलिसांनाही हाताशी धरले असल्याची चर्चा आहे. फलटण-कऱ्हाड येथील गुन्हेगारांशी त्याचे काय कनेक्शन आहे, याचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.दरम्यान, कऱ्हाड येथील टोळीच्या गराड्यातून पसार झालेले तिघे संशयित हे कोल्हापुरातील कुप्रसिद्ध टोळीचे म्होरके असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यांच्यावरही खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लूटमार, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ते फोन बंद करून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या गुंडांच्या मदतीसाठी दिवसभर सातारा, कऱ्हाड सह कोल्हापुरातील काही गुंड जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसभर तळ ठोकून होते.कळंबा ते पाचगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी शिताफीने संशयित किरण गुलाब गावित ( रा. सैदापूर, विद्यानगर, कऱ्हाड , जि. सातारा), श्रीकांत ऊर्फ गोट्या चंद्रकांत कदम (रा. कॉलेज रोड, शुक्रवार पेठ, फलटण, जि. सातारा), चेतन शिवाजी कांबळे , संदीप शिवाजी कांबळे (दोघे रा. शारदानगर, काळकी, शिवतेज निवास, ता. फलटण, जि. सातारा), शिवराज सुरेश इंगवले (रा. लाहोटीनगर, मलकापूर, कऱ्हाड, जि. सातारा), नितीन गणपत शिर्के (रा. नांदलापूर, ता. कऱ्हाड , जि. सातारा) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यात दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, दोन कार असा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यांतील एक कार संदीप कांबळे याच्या पत्नीच्या नावावर आहे. तर दुसरी शिर्के याच्या मित्राची आहे.

या टोळीला सातारा येथील राजकीय वलय आहे. त्यांना अटक झाल्याचे समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बड्या लोकप्रतिनिधींचे फोन झाले; परंतू पोलिसांचा गुन्'ांचे गांभीर्य लक्षात घेत मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संशयित किरण गावित हा टोळीचा म्होरक्या आहे. त्याने वाळूमाफियांच्या वादातून सल्यावर न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडल्या होत्या. त्यापासून कऱ्हाड येथील एक सक्रिय टोळी त्याचा गेम करण्याच्या मागावर आहे. त्यातून आपला बचाव व्हावा, यासाठी त्याची कट-कारस्थाने सुरू आहेत.

त्याचा कोल्हापुरातील गुन्हेगारी टोळ्यांशी हातमिळवणी करण्याचा उद्देश असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. जवाहरनगर परिसरातील ‘डॉन’ची दिवसभरातील पोलीस ठाण्याच्या आवारातील घालमेल पाहून त्याचा या टोळीशी काही संबंध आहे काय, याचाही पोलीस कसून शोध घेत आहेत.

टोळीयुद्ध भडकण्याची शक्यताकऱ्हाड येथील किरण गावित याच्यासह साथीदारांकडे मिळून आलेली पिस्तुले ही राजस्थानामधून खरेदी केल्याचे पुढे आले आहे. कोल्हापुरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांशी त्यांची बैठक होणार होती. त्यामध्ये ‘गेम’ हाच प्लॅन त्यांचा होता. ते सुपारी घेऊन कोणाची गेम करणार होते काय, या दृष्टीनेही पोलीस चौकशी करीत आहेत.

गावित कोल्हापुरात आल्याची टिप एका गुन्हेगारी टोळीनेच दिली आहे. त्यामुळे भविष्यात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसर