Kolhapur: आजपासून काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेला सुरुवात
By भीमगोंड देसाई | Updated: August 8, 2022 21:44 IST2022-08-08T21:43:20+5:302022-08-08T21:44:34+5:30
Kohlapur: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज, मंगळवारपासून जिल्ह्यात आझादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यात्रा प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. १४ ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल.

Kolhapur: आजपासून काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेला सुरुवात
- भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज, मंगळवारपासून जिल्ह्यात आझादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यात्रा प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. १४ ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल. यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, यात्रा संपूर्ण राज्यात निघणार आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका, गावात जाणार आहे. ज्या ठिकाणाहून या यात्रेस प्रारंभ होणार आहे त्या ठिकाणी काँग्रेस नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी आपल्या व परिसरातील घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा. यात्रा जाणाऱ्या रस्त्यावरील गावे, शहरातील घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा. जे स्वातंत्र्यसैनिक आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचे चरण स्पर्श करावे. जे स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत त्यांच्या वीरपत्नी व वारसांची प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचा सन्मान करावा.
पत्रकार परिषदेस माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील, गोकूळचे संचालक बयाजी शेळकेे, अंजना रेडेकर, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.