शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्राध्यापकांच्या ‘बेमुदत कामबंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 17:39 IST

रिक्तपदांची त्वरीत कायमस्वरूपी भरती करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो) सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली मंगळवारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देप्राध्यापकांच्या ‘बेमुदत कामबंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसादसरकारच्या विरोधात निदर्शने; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

कोल्हापूर : रिक्तपदांची त्वरीत कायमस्वरूपी भरती करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो) सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली मंगळवारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरासह गडहिंग्लज, जयसिंगपूर, इचलकरंजी येथे प्राध्यापकांनी निदर्शने केली.७१ दिवसांचा पगार मिळालाच पाहिजे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नियमित वेतन मिळालेच पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी एम्फुक्टोने आंदोलन पुकारले आहे. त्यातील एक टप्पा म्हणून बेमुदत कामबंद आंदोलन प्राध्यापकांनी मंगळवारपासून सुरू केले. त्यात सहभागी प्राध्यापकांनी शहर आणि जिल्ह्यातील महाविद्यालयात बायोमेट्रीकअथवा मस्टरद्वारे हजेरी नोंदविली नाही.

शहरातील प्राध्यापक आणि सुटाचे पदाधिकारी सकाळी अकरा वाजता टाऊनहॉल बागेत जमले. याठिकाणी त्यांनी प्रलंबित मागण्याबाबत आणि सरकारच्या विरोधात ‘प्राध्यापकांना रस्त्यावर आणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ ‘महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा’, अशा घोषणा देत त्यांनी निदर्शने केली.

यानंतर झालेल्या सभेत एम्फुक्टोचे उपाध्यक्ष सुभाष जाधव, सुटाचे मुख्य समन्वयक एस. जी. पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक सुधाकर मानकर, प्रमुख कार्यवाह डी. एन. पाटील, अध्यक्ष अरूण पाटील, डॉ. अरूण शिंदे, सयाजीराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एस. ए. बोजगर, अशोक कोरडे, आदी उपस्थित होते.

दरम्यान, या आंदोलनाला पहिल्या दिवशी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही महाविद्यालयांतील निम्मे प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले, तर उर्वरीत प्राध्यापकांनी महाविद्यालयातील कामकाज पाहिले. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी (सीएचबी) अनेक महाविद्यालयांतील कामकाज सांभाळले.

ज्या विषयांचे प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्या विषयांचे अधिकत्तर महाविद्यालयांत तास झाले नाहीत. तास झाले नसल्याने ग्रंथालय, विद्यार्थी कक्षासह महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी थांबून होते. आंदोलनात ज्या महाविद्यालयांतील पूर्ण प्राध्यापक सहभागी झाले, तेथील शैक्षणिक कामकाज ठप्प झाले. आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ८० टक्के प्राध्यापक सहभागीया आंदोलनात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ९० टक्के महाविद्यालयांतील ८० टक्के प्राध्यापक सहभागी झाले. शहरातील टाऊन हॉल आणि इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर येथे प्राध्यापकांनी एकत्रित येऊन निदर्शने केली. मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू राहील. मागण्यांबाबत सकारात्मक आणि ठोस निर्णय सरकारने घ्यावा. अन्यथा निदर्शने, मोर्चाद्वारे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे एम्फुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. सुभाष जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठProfessorप्राध्यापकkolhapurकोल्हापूर