कोल्हापूर : कामचुकारांना दणका; चार कर्मचारी बडतर्फ, महापालिका आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:01 PM2018-06-09T12:01:35+5:302018-06-09T12:01:35+5:30

सतत गैरहजर राहणाऱ्या व कामचुकार कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन व बडतर्फ करण्याच्या कारवाईचा धडाका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सुरू ठेवला आहे.  चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, त्यांना नोटीस देण्यात आली.

Kolhapur: Bunch of workers; The action of Municipal Commissioner, four employees | कोल्हापूर : कामचुकारांना दणका; चार कर्मचारी बडतर्फ, महापालिका आयुक्तांची कारवाई

कोल्हापूर : कामचुकारांना दणका; चार कर्मचारी बडतर्फ, महापालिका आयुक्तांची कारवाई

Next
ठळक मुद्देकामचुकारांना दणका; चार कर्मचारी बडतर्फकोल्हापूर महापालिका आयुक्तांची कारवाई

कोल्हापूर : सतत गैरहजर राहणाऱ्या व कामचुकार कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन व बडतर्फ करण्याच्या कारवाईचा धडाका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सुरू ठेवला आहे.  चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, त्यांना नोटीस देण्यात आली.

यामध्ये आरोग्य विभागातील दीपक सुरेश कांबळे, झाडू कामगार दीपक कृष्णा जाधव व उद्यान विभागाचा शिपाई मनोज दिनकर तोरस्कर व अग्निशमन दलाचा सतीश रंगराव यादव अशी बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तत्पूर्वी या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.

परंतु, त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ५६/२/ह नुसार या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. या कर्मचाऱ्यांना अपील करण्याची संधी आहे. याबाबतचे आदेश उपायुक्त मंगेश शिंदे यांनी काढले.

आयुक्तांच्या कारवाईचे स्वागत

आयुक्त डॉ. चौधरी यांनी महापालिकेच्या प्रशासनावर वचक ठेवण्याचे काम सुरू केले आहे. यापूर्वी त्यांनी सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.  चार कर्मचाऱ्यांना सेवेतूून बडतर्फ केल्याने प्रशासनात खळबळ उडाली. चौधरी यांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

 

Web Title: Kolhapur: Bunch of workers; The action of Municipal Commissioner, four employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.