शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मुलींच्या छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे साताऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 11:38 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींच्या पाठीमागे लागेल त्याला ‘निर्भया’ची लाठी खावावी लागणार आहे. कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये ‘निर्भया’ने कठोर कारवाई केली आहे. तरुणी-महिलांना आता ‘निर्भया पथकाचा आधार, बनवा जीवन आपले रूबाबदार’ असा संदेश यानिमित्ताने दिला जात आहे.

ठळक मुद्देमुलींच्या छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे साताऱ्यातवर्षात ४६ हजार जणांवर कारवाई ‘निर्भया’ पथकाचा मिळतो मोठा आधार

कोल्हापूर : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींच्या पाठीमागे लागेल त्याला ‘निर्भया’ची लाठी खावावी लागणार आहे. कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये ‘निर्भया’ने कठोर कारवाई केली आहे. तरुणी-महिलांना आता ‘निर्भया पथकाचा आधार, बनवा जीवन आपले रूबाबदार’ असा संदेश यानिमित्ताने दिला जात आहे.मावळत्या वर्षात परिक्षेत्रात तरुणी व महिलांची छेड काढणाऱ्या ४६ हजार २८१ युवकांना ‘निर्भया’ पथकाने ‘खाकीचा प्रसाद’ दिला आहे. सर्वाधिक छेडछाडीचे प्रमाण सातारा जिल्ह्यात आहे. पुणे ग्रामीणमध्ये हे प्रमाण कमी आहे. गतवर्षातील पथकाच्या या कारवाईचा परिक्षेत्रात चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील १४६ पोलीस ठाण्यांमध्ये तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ पथकाची स्थापना केली. प्रत्येक जिल्ह्यात सध्या दहा पथके आहेत. त्यामध्ये एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या पथकांना स्वतंत्र ड्रेसकोड व दिमतीला वेगवान दुचाकी व चारचाकी देण्यात आल्या आहेत. ‘निर्भया’ पथकाने विविध ठिकाणी तरुणींची छेड काढणे, शेरेबाजी करणे, रस्ता अडविणे, पाठलाग करणे, हातवारे करणे अशी दुष्कृत्ये करणाऱ्या ४६ हजार २८१ तरुणांना ‘खाकी’चा प्रसाद देत कारवाई केली आहे.

पथकाने १२०० ठिकाणी प्रबोधन कार्यक्रम घेतले आहेत. ४ हजार जणांचे समुपदेशन केले आहे. कारवाईची चाहूल कोणालाच लागत नाही. छेडछाड करत असल्याचे व्हिडिओ शूटिंग करून त्याला रंगेहात पकडले जाते.निर्भया या तक्रारींवर करते कारवाईतुमचा कोणी पाठलाग करून छेडछाड करीत असेल, मोबाईल, सोशल मीडियाद्वारे जास्त त्रास देत असेल, दैनंदिन येण्या-जाण्याच्या रस्त्यावर मुले छेड काढत असतील किंवा असे एखादे कृत्य की ज्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, भावनिकरीत्या ब्लॅकमेल करणे, अश्लील बोलणे, शिवीगाळ करणे, मोबाईलवर अश्लील चित्रफीत, फोटो तयार करून इतरांना पाठविणे, अश्लील भाषेत बोलणे, मॅसेज पाठविणे, मानसिक त्रास होईल, मनाला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करणाऱ्यांची निर्भया पथक गय करणार नाही.कारवाईची आकडेवारी अशी

  1. कोल्हापूर-१०५४७
  2. सांगली-१२६४५
  3. सातारा-१३५५९
  4. सोलापूर ग्रामीण-७६२०
  5. पुणे ग्रामीण-१९२८

युवती व महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ही कारवाई अधिक सक्षम आणि कठोर करण्यावर आमचा भर राहील.- आरती नांद्रेकर,‘निर्भया’ कोल्हापूर विभागपथक प्रमुख

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरSangliसांगली