कोल्हापूर :  पत्ता विचारण्याचा बहाणा करीत तरुणाला लुटले  मेरी वेदर मैदान समोरील घटना : तिघा लुटारुंचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:24 IST2018-10-01T13:22:15+5:302018-10-01T13:24:38+5:30

पत्ता विचारण्याचा बहाणा करीत तरुणाला तिघांनी मारहाण करीत रोकडसह मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. शनिवार (दि. २९) सप्टेंबरला मेरीवेदर मैदान कॉर्नरला लघुशंकेसाठी थांबले असताना हा प्रकार घडला.

Kolhapur: Believing to ask the address, incident of gang rape: Three gang rape acts | कोल्हापूर :  पत्ता विचारण्याचा बहाणा करीत तरुणाला लुटले  मेरी वेदर मैदान समोरील घटना : तिघा लुटारुंचे कृत्य

कोल्हापूर :  पत्ता विचारण्याचा बहाणा करीत तरुणाला लुटले  मेरी वेदर मैदान समोरील घटना : तिघा लुटारुंचे कृत्य

कोल्हापूर : पत्ता विचारण्याचा बहाणा करीत तरुणाला तिघांनी मारहाण करीत रोकडसह मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. शनिवार (दि. २९) सप्टेंबरला मेरीवेदर मैदान कॉर्नरला लघुशंकेसाठी थांबले असताना हा प्रकार घडला. पाकिटामध्ये मोबाईल, साडेसात हजार रुपये, एटीएम कार्ड होते.

अधिक माहिती अशी, चेतन श्रीकांत सारडा (वय २८, रा. रामेश्वरी बंगला, रमणमळा) हे शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दूचाकीवरुन घरी जात होते. मेरीवेदर मैदानासमोरील कॉर्नरला ते लघुशंकेसाठी थांबले असताना त्यांचे जवळ मोपेडवरुन तिघे तरुण आले. त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्यांच्या खिशातील मोबाईल, पैशाचे पाकिट काढून घेतले. त्यांनी विरोध केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी ते पाठलाग करती म्हणून त्यांच्या दूचाकीची चावी काढून घेत पोबारा केला. भेदरलेल्या सारडा यांनी याप्रकरणी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. संशयित कावळा नाका, विचारेमाळ किंवा कनाननगर येथील असण्याची शक्यता पोलीसांना आहे. त्यादूष्ठीने पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title: Kolhapur: Believing to ask the address, incident of gang rape: Three gang rape acts