कोल्हापूर : जागेच्या वादातुन बापलेकास मारहाण-- भुयेवाडीत जागेच्या वादातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:29 IST2019-04-10T13:27:18+5:302019-04-10T13:29:42+5:30

राजारामपुरी शाहु कॉलनी येथील जागेच्या वादातून बापलेकास बेदम मारहाण करण्यात आली.

Kolhapur: Attacking Bapelak from the promise of land- Hit the plot of land in Bhayivadi | कोल्हापूर : जागेच्या वादातुन बापलेकास मारहाण-- भुयेवाडीत जागेच्या वादातून मारहाण

कोल्हापूर : जागेच्या वादातुन बापलेकास मारहाण-- भुयेवाडीत जागेच्या वादातून मारहाण

ठळक मुद्देचौघांवर गुन्हा, राजारामपुरी शाहु कॉलनी येथील प्रकार

कोल्हापूर : राजारामपुरी शाहु कॉलनी येथील जागेच्या वादातून बापलेकास बेदम मारहाण करण्यात आली. प्रविण विठ्ठल खुड्डे (वय ३०), त्याचे वडील विठ्ठल दादोबा खुड्डे (६०, दोघे रा. शाहु कॉलनी, विक्रमनगर) अशी जखमींची नावे आहेत.

पोलीसांनी सांगितले, विठ्ठल खुड्डे आणि संशयित संपदा अर्जुन कांबळे (५०), राजेंद्र अर्जुन कांबळे (३०), विक्रम राजेंद्र कांबळे (२६), संतोष भिमराव कांबळे (२२, सर्व रा. विक्रमनगर) यांचेत जागेच्या वाद आहे. मंगळवारी दोन्ही कुटूंबात पुन्हा वाद झाला. यावेळी संशयितांनी बापलेकास मारहाण करुन विठ्ठल यांच्या डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संशयित कांबळे कुटूंबियावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.


एक जखमी : तिघांवर गुन्हा

कोल्हापूर : भुयेवाडी (ता. करवीर) येथील शेताकडे जाणाऱ्या सामुदायीक जागेच्या वादातून तिघाजणांनी केलेल्या मारहाणीत मोहन शहाजी पाटील (वय ३८) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलीसांनी संशयित विश्वास आनंदराव पाटील, जयाराज विश्वास पाटील, चंद्रदिप विश्वास पाटील (सर्व रा. भुयेवाडी) यांचेवर मंगळवारी गुन्हा दाखल केला.

संशयितांनी गावचे हद्दीतील गट नंबर ५३ चे श्ेतजमिनीत जाणेस असणाऱ्या सामुदायिक रस्त्यावर सिमेंटचे पाईप व लाकडे टाकून रस्ता बंद केला होता. याबाबत मोहन पाटील हे विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना काठीने डोक्यात वार करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे तपास करीत आहेत.
 

Web Title: Kolhapur: Attacking Bapelak from the promise of land- Hit the plot of land in Bhayivadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.