आशिया गेम्समध्ये कोल्हापूरचा अनिकेत करणार भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधित्व

By सचिन भोसले | Published: July 29, 2023 04:39 PM2023-07-29T16:39:44+5:302023-07-29T17:17:17+5:30

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरीत आणखी एक मानाचा तुरा अनिकेत जाधव याने रोवला. त्याची हँगजहाऊ (चीन) मध्ये २३ सप्टेंबर ते ...

Kolhapur Aniket Jadhav selected in Indian football team for Asian Games | आशिया गेम्समध्ये कोल्हापूरचा अनिकेत करणार भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधित्व

आशिया गेम्समध्ये कोल्हापूरचा अनिकेत करणार भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधित्व

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूरच्याफुटबॉल पंढरीत आणखी एक मानाचा तुरा अनिकेत जाधव याने रोवला. त्याची हँगजहाऊ (चीन) मध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या आशियाई गेम्स स्पर्धेसाठी आघाडीचा खेळाडू म्हणून भारतीय फुटबॉल संघात निवड झाली. या संघाची घोषणा आज, शनिवारी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्यावतीने करण्यात आली.

अनिकेतच्या फुटबॉलची कारकीर्द बालेवाडी (पुणे) क्रीडा प्रबोधिनीतून झाली. त्याची फुटबॉल कारकीर्द घडवण्यासाठी जयदीप अंगीरवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. २०१७ साली भारतात झालेल्या १७ वर्षाखालील फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर २०१८ -२०१९ दरम्यान त्याची  इंडियन अर्रोज या व्यावसायिक फुटबॉल संघाकडून निवड झाली.

त्यानंतर जमशदपुर ए.एफसी, हैदराबाद एफसी, ईस्ट बेंगॉल, ओडिसा एफसी अशा देशातील नामांकित फुटबॉल संघाकडून व्यावसायिक खेळाडू आणि त्याचबरोबर २०२२ मध्ये बहरीन व बेलारूस येथे झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. आता चीन येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघात आघाडीचा खेळाडू म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे त्याच्या शाहूपुरी पाचव्या गल्ली येथील घरात आणि कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्यावसायिक फुटबॉल लीग स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीमुळे  आज माझी आशिया गेम्स साठी भारतीय फुटबॉल संघाच्या पथकात निवड झाली. ही बाब मला व माझ्या कुटुंबास कोल्हापूरकरांना भूषणावह आहे. मला सातत्याने शाहू छत्रपती,  संभाजीराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे. आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभत आहे. - अनिकेत जाधव, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

Web Title: Kolhapur Aniket Jadhav selected in Indian football team for Asian Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.