लोकमत न्यूज नेटवर्क
Shivjayanti : राज्यभरात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा होत असताना खेड्यापाड्यांमध्येही त्याच उत्साहाचे दर्शन घडले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथे स्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ किल्ले रांगणा येथून पहाटे शिवज्योत आणण्यात आली. “जय जय महाराष्ट्र माझा” या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मराठी शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या समूहगीताने वातावरण भारावून गेले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच लक्ष्मी गुरुनाथ घोळसे यांच्या हस्ते झाले, तर उपसरपंच राजाराम पाटील यांनी ज्योतपूजन केले. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत निवड झालेल्या गावकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
गावातील महिलांच्या उपस्थितीत महाराजांचा पाळणा सोहळा संपन्न झाला. अफजलखान वधाच्या प्रसंगावर आधारित पोवाडा विद्या मंदिर अलबादेवी शाळेचे अध्यापक राजाराम पाटील यांनी प्रभावीपणे सादर केला. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. शेवटी मुला-मुलींनी लाठी-काठीसारख्या शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सांगता केली. शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
Web Summary : Shiv Jayanti was celebrated with fervor in Alabadevi, Chandgad. Events included a procession, cultural performances, student recognition, and traditional demonstrations, concluding with enthusiastic chants of Shivaji Maharaj's name.
Web Summary : अलबादेवी, चंदगढ़ में शिव जयंती धूमधाम से मनाई गई। आयोजनों में जुलूस, सांस्कृतिक कार्यक्रम, छात्र सम्मान और पारंपरिक प्रदर्शन शामिल थे, जिसका समापन शिवाजी महाराज के नाम के उत्साही नारों के साथ हुआ।