कोल्हापूर : परितेत ६० हजारांचे दागिने चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:09 IST2018-12-06T16:07:26+5:302018-12-06T16:09:17+5:30

परिते (ता. करवीर) येथील घराच्या पाठिमागील लोखंडी शटर उचकटून तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, सोन्याचे एक तोळ्याचे झुमके असा सुमारे ६० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

Kolhapur: After stolen jewelery worth 60 thousand jewelery | कोल्हापूर : परितेत ६० हजारांचे दागिने चोरीस

कोल्हापूर : परितेत ६० हजारांचे दागिने चोरीस

ठळक मुद्देपरितेत ६० हजारांचे दागिने चोरीसपोलिसात नोंद

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील घराच्या पाठिमागील लोखंडी शटर उचकटून तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, सोन्याचे एक तोळ्याचे झुमके असा सुमारे ६० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

ही घटना १७ ते १९ आॅक्टोंबर या कालावधीत घडली. याबाबत आप्पासो बळवंत जाधव (वय ३६, रा. परिते) यांनी करवीर पोलिसात बुधवारी (दि. ५) नोंद दिली.

पोलिसांनी सांगितले की, परितेतील आप्पासो जाधव हे कुटूंबासह वाळवे खुर्द (ता. कागल) येथे सासुरवाडीला १७ आॅक्टोंबर २०१८ ला दिपावली सुट्टीनिमित्त गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या पाठिमागील लोखंडी शटर उचकटले.

घरातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे कानातील सोन्याचे झुमके असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना १९ आॅक्टोंबरला उघडकीस आली. बाजारभावाने सुमारे एक लाख रुपये याची किंमत होते. याची नोंद पोलिसात झाली आहे.

Web Title: Kolhapur: After stolen jewelery worth 60 thousand jewelery