शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अबब, वाकरे गावात नागिणीला २१ पिल्ले, पोर्लेकरांनी दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:04 IST

सकाळची वेळ...गेले दोन महिने घराभोवती शत्रूसारखा घिरट्या घालणारा साप बिळात गेल्याचे त्यांनी पाहिले..आणि त्याला मारण्याच्या इराद्याने, त्यांनी बिळात डोकावून पाहिलं तर त्या सापाजवळ अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला आणि सर्पमित्रांना बोलावून नागिणीसह अंड्यांना जीवदान दिले. करवीर तालुक्यातील वाकरे येथील तुकाराम कर्पे यांच्या कुटूंबाने वन्यजीवाबाबत दाखवलेल्या कृतज्ञतेचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देपिलांचा जन्म होताच वनक्षेत्रात सुखरुप पोहोचविलेसर्पमित्र दिनकर चौगुले यांनी केली मदत

सरदार चौगुलेकोल्हापूर /पोर्ले तर्फ ठाणे : सकाळची वेळ...गेले दोन महिने घराभोवती शत्रूसारखा घिरट्या घालणारी नागिण बिळात गेल्याचे त्यांनी पाहिले..आणि त्याला मारण्याच्या इराद्याने, त्यांनी बिळात डोकावून पाहिलं तर त्या सापाजवळ अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला आणि सर्पमित्रांना बोलावून नागिणीसह अंड्यांना जीवदान दिले. करवीर तालुक्यातील वाकरे येथील तुकाराम कर्पे यांच्या कुटूंबाने वन्यजीवाबाबत दाखवलेल्या कृतज्ञतेचे कौतुक होत आहे.सापाच्या जातीतील किंग कोब्राचाअपवाद सोडला तर सर्वसामान्य सर्वच साप निसर्गाच्या पोषक वातावरणात अंडी घालून निघून जातात ; परंतू वाकरे येथे शेतवाडीत राहणाऱ्या तुकाराम वर्पे यांच्या घराजवळ गेले दोन महिने सापांच्या अंड्याजवळ राहणाऱ्यां एका नागिणीने पिलांचे संरक्षण कवच बनून पहारा देत या समजूतीला धक्का दिला आहे.सोमवारी सकाळी ती नागिण बिळात शिरताना वर्पे यांना दिसली. मुलगा संदिपने बॅटरीच्या उजेडात बिळात डोकावले तर त्या नागिणीशेजारी अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवत पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील सर्पमित्र दिनकर चौगुले, विवेक चौगुले, कृष्णात सातपुते, अभिजीत पाटील (जाफळे) यांना पाचारण केले. त्यांच्या मदतीने त्या नागिनीसह एकुण २१ अंडी बिळातून बाहेर काढण्यात आले.

अंडी बाहेर काढताना अंड्यांच्या कवचातून बुडबुडे बाहेर येत असल्याचे जाणवत होते. पिलांचे दिवस भरल्याने पोर्ले येथील सर्पमित्रांनी अंडी उबवण्यासाठी विशिष्ट वातावरण निर्मिती केली आणि दोन दिवसात ती अंडी उबवू देऊन पिल्लांचा निपज केला.सर्पमित्रांनी नागिणीसह या २१ पिलांना पन्हाळ्याचे वनरक्षक ईश्वर जाधव, वनमजूर तानाजी लव्हटे यांच्या साक्षीने सुरक्षित वनक्षेत्रात सोडून दिले.अन्नसाखळीचा असाही अनुभव...कॉमन कोब्रा (नाग) वर्षातून एकदा अंडजद्वारे पिलांना जन्म देतात. मार्च महिन्यात साप अंडी घालतात. त्यानंतर अंडी उबवायला ५५ ते ६० दिवसाचा कालावधी लागतो. मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात विशिष्ट वातावरणात अंडी ऊबवून पिल्ली बाहेर पडतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला सापांच्या पिल्लांची निपज होते लहान बेडकांसह अन्य भक्षकांची निपजही याच दरम्यान होते. त्यामुळे लहान सापांच्या भक्ष्याचा प्रश्न निसर्गच मिटवितो. निसर्ग चक्रातील अन्नसाखळीचे हे जिवंत उदाहरण आहे.

वन्यप्राणी व पशूपक्षी लहान पिल्लांचे मोठे होईपर्यंत संगोपन करतात आणि त्यानंतरच त्याला मनसोक्त फिरण्यासाठी सोडून देतात. परंतू सर्वसामान्य सापाच्यांत (अपवाद किंग कोब्रा) अंड्याजवळ थांबून ती उबवण्याची पध्दतच नाही; परंतू वाकरे येथील अंड्याजवळ थांबलेल्या या नागिणीने दोन महिने थांबून मातृत्व सिध्द केले आहे.दिनकर चौगुले,सर्पमित्र, पोर्ले तर्फ ठाणे 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूरforestजंगल