शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

कोल्हापूर : सीपीआरमध्ये २ डी इको व हृदय रोग तपासणी शिबीर, २८८ जणांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:02 PM

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मध्ये होत असलेल्या या शिबीरामधून २ डी इको व हृदय रोग तपासणी शिबीरामधून ज्या रुग्णांना मुंबई, पुणे येथे उपचार होणे आवश्यक आहे त्यांना रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांच्या राहण्याच्या खर्चासह सर्व मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देसीपीआरमध्ये २ डी इको व हृदय रोग तपासणी शिबीरराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शिबीर, २८८ जणांची नोंदणी

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मध्ये होत असलेल्या या शिबीरामधून २ डी इको व हृदय रोग तपासणी शिबीरामधून ज्या रुग्णांना मुंबई, पुणे येथे उपचार होणे आवश्यक आहे त्यांना रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांच्या राहण्याच्या खर्चासह सर्व मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.

सीपीआरमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर व धमार्दाय आयुक्त कार्यालय यांच्यातर्फे सीपीआरच्या आॅडीटोरियम हॉल येथे २ डी इको शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूरसह शेजारच्या जिल्हयातून अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन याठिकाणी आले होते.दिवसभरात २८८ जणांनी याची नोंदणी केली होती. त्यामुळे सायंकाळपर्यंत या बालकांची तपासणी सुरु होती.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्यमंत्री, वैद्यकिय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे, धमार्दाय सहआयुक्त निवेदिता पवार, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यवैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ओमप्रकाश रामानंद, सहाय्यक धमार्दाय आयुक्त आर.जी.चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस.पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.चंद्रकांत पाटील म्हणाले, हदयरोगाशी संबंधित ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची २ डी ईको व हदय रोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबीर होत असून यामधील सदोष रुग्णांवर (बालकांवर) गरजेनुसार मुंबईतील नामवंत रुग्णालय,कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून पुर्णपणे मोफत पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही गरजवंत उपचारापासून वंचित राहणार नाही. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. प्रत्येक गरजवंताला वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी कावळानाकाजवळील शासकीय विश्रामगृह येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.ओमप्रकाश शेटे म्हणाले, पैशाअभावी उपचार न मिळणे हे अत्यंत दुखदायक असून असे होऊ नये यासाठी मुख्यमंत्री, वैद्यकिय सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. पूर्वी 25 हजार रुपये असणाऱ्या वैद्यकीय मदतीच्या रकमेत वाढ करुन दीड लाखापर्यंत करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे साडे सहाशे कोटी रुपयांचे काम गेल्या तीन वर्षात झाले आहे.

डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची कामगिरी राज्यात पहिल्या क्रमांकाची आहे. गतवर्षी १०७० पैकी १०५७ मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये 197 पैकी 97 मुलांवर हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया झाल्या. अशा प्रकारच्या शिबीरांमधून दुर्धर आजार असणा?्या मुलांना उपचार उपलब्ध होऊन ते बरे होतात.डॉ. रामानंद यांनी स्वागत तर डॉ. एल.एस.पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुंबई एस आर सी सी चिल्ड्रन हॉस्पीटल विशेष तज्ञ डॉ. दिपक चंगलाणी,त्यांचे पथक,डॉ. शिशिर मिरगुंडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, यांच्यासह शिबीरार्थी उपस्थित होते. आर. जी. चव्हाण यांनी आभार मानले.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल