कोल्हापूर : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले 20 उमेदवार विजयी : हर्षवर्धन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 15:50 IST2018-08-04T15:42:20+5:302018-08-04T15:50:13+5:30
सांगली,मिरज, कुपवाड येथील महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस मधून ऐनवेळी भाजपमध्ये गेलेले 39 उमेदवार होते, त्यातील 20 निवडून आले आहेत अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे दिली.

कोल्हापूर : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले 20 उमेदवार विजयी : हर्षवर्धन पाटील
ठळक मुद्देकाँग्रेसमधून ऐनवेळी भाजपमध्ये गेलेले 20 उमेदवार विजयी काँग्रेसच्या दृष्टीने हा पराभव धक्कादायक
कोल्हापूर : सांगली,मिरज, कुपवाड येथील महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस मधून ऐनवेळी भाजपमध्ये गेलेले 39 उमेदवार होते, त्यातील 20 निवडून आले आहेत अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या दृष्टीने सांगली महापालिकेच्या निवडणुकीतील पराभव धक्कादायक आहे, पण निवडणुकीत शेवटी विजय हा विजयच असतो अशीही टिप्पणी केली..