शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधी १५ दिवसांत वटहुकूम, पालकमंत्री पाटील यांची ग्वाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 14:34 IST

अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीच्या सदस्यांशी मोबाईलवरून बोलताना दिली. मुदतीत हा कायदा संमत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला. ​​​​​​​

ठळक मुद्देफक्त अंबाबाई मंदिरासाठीच स्वतंत्र कायदा : शिवसेनेचा आग्रह कायदा संमत न झाल्यास आंदोलन, अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीचा इशारा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीच्या सदस्यांशी मोबाईलवरून बोलताना दिली. मुदतीत हा कायदा संमत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला.अंबाबाई मूर्तीला ९ जूनला घागरा चोली नेसवल्याच्या प्रकरणानंतर कोल्हापूरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात पगारी पूजारी नियुक्तीसंबंधीचा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. आता अधिवेशन संपत आले तरी कायदयाचा विषय चर्चेस आलेला नाही. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने बैठक घेवून आंदोलनाची दिशा निश्चित केली.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले,‘मंत्री चंद्रकांतदादांशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेवरून पुढील पाच दिवसात पगारी पुजारीविषयी चर्चा होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे या अधिवेशनात कायदा संमत होण्याची शक्यता कमी आहे.

२२ तारखेला अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी जावू दे. त्यानंतर पगारी पुजारी नियुक्तीचा वटहुकूम काढू व मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करू असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला आहे.

संघर्ष समिती मात्र मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार अधिवेशन काळातच कायदा संमत व्हावा यासाठी आग्रही आहे. या कालावधीत कायदा संमत न झाल्यास त्यासंबंधीचा वटहुकूम निघून त्याचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत आम्ही पून्हा आंदोलन करू.’

यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर आर. के. पोवार, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, बाबा पार्टे, चारुलता चव्हाण, प्रा. जयंत पाटील, शरद तांबट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फक्त अंबाबाई मंदिरासाठीच स्वतंत्र कायदा 

पंढरपूरप्रमाणे केवळ अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासाठी संघर्ष समितीने आंदोलन केले आहे. मात्र शासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिराचा एकत्रित विचार करत आहे. असे झाल्यास हा कायदा पून्हा रखडणार आहे. त्यामुळे फक्त अंबाबाई मंदिरासाठीच स्वतंत्र कायदा करण्यात यावा असा आमचा आग्रह असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व दिलीप पाटील यांनी सांगितले.

कोल्हापुरात शनिवारी अंबाबाई मंदिरातील पगारी पूजारी नियुक्ती संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पूजारी हटाव संघर्ष समितीची बैठक झाली. त्यास शरद तांबट, विजय देवणे, संजय पवार, आर. के. पोवार, दिलीप पाटील, चारुलता चव्हाण, प्रा. जयंत पाटील आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार) 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलAmbadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर