शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

कोल्हापूर : दहा रूपयाला बुट्टीभर लिंबू, गवार, भेंडी, दोडका ऐंशी रुपयांच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:45 AM

लिंबूची आवक कायम असली तरी पावसामुळे मागणी कमालीची घटली आहे. त्याचा थेट परिणाम दरावर झाला असून रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात लिंबूचे ढीगच दिसत होते. दहा रुपयाला बुट्टीभर लिंबू विक्रीस होते. भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर वधारले असून गवार, भेंडी व दोडका या प्रमुख भाज्यांचे दर प्रतिकिलो ऐंशी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गत आठवड्यात साखरेचे दर काहीसे सुधारले होते, पण पुन्हा घसरण सुरू झाले असून किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३४ रुपये दर आहे.

ठळक मुद्देदहा रूपयाला बुट्टीभर लिंबूगवार, भेंडी, दोडका ऐंशी रुपयांच्या वर साखरेच्या दरात घसरण

कोल्हापूर : लिंबूची आवक कायम असली तरी पावसामुळे मागणी कमालीची घटली आहे. त्याचा थेट परिणाम दरावर झाला असून रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात लिंबूचे ढीगच दिसत होते. दहा रुपयाला बुट्टीभर लिंबू विक्रीस होते.

भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर वधारले असून गवार, भेंडी व दोडका या प्रमुख भाज्यांचे दर प्रतिकिलो ऐंशी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गत आठवड्यात साखरेचे दर काहीसे सुधारले होते, पण पुन्हा घसरण सुरू झाले असून किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३४ रुपये दर आहे.

पावसाळा सुरू झाल्याने लिंबूची मागणी एकदम कमी झाली आहे. रविवारी लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात दहा रुपयाला प्लास्टिकची बुट्टी भरून लिंबू मिळत होते.

उन्हाळा संपला की लिंबूच्या मागणीत घट होऊन दरात घसरण सुरू होते. पण यंदा लिंबूची आवक अजूनही चांगली आहे, त्यात मागणी एकदमच कमी झाल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. घाऊक बाजारात तीनशे रुपयांना चुमडे आहे. किरकोळ बाजारात तर दर एकदम खाली आले आहेत. लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात पिवळे धमक रसरसीत लिंबू रुपयाला होते.

लहान-मोठे बुट्टीभर लिंबू दहा रुपयांना मिळत होते. पावसाने सुरुवात केल्याने बाजारात स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दर चांगलेच तेजीत राहिले आहेत.

गवार, भेंडी, दोडका या प्रमुख भाज्यांचे दर ऐंशी रुपये किलोपर्यंत गेले आहेत. टोमॅटोचे दर ही थोडेसे वधारले असून वीस रुपये किलो राहिला आहे. कोबी, वांगी, ढब्बू, कारली, वरणा या भाज्यांचे दर काहीसे स्थिर आहेत. पालेभाज्यांमध्ये मेथी पंधरा रुपये पेंढी, पोकळा, पालक दहा रुपये पेंढी आहे.फळ मार्केटमध्ये अननस, तोतापुरी आंब्याची रेलचेल आहे. लालबागच्या आंब्याची आवक अजून सुरू असून साधारणत: ४० रुपये किलो दर राहिला आहे. सफरचंद, डाळींब, पेरूची आवक कायम आहे. अननस वीस, तीस रुपये तर तोतापुरी आंबा दहा रुपयाला आहे.

तूरडाळ, हरभराडाळीसह इतर डाळींच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. सरकी तेल, शाबूचे दर स्थिर असून साखरेच्या दरात थोडी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात ३६ वरून ३४ रुपये किलोपर्यंत साखर खाली आहे.शेतीकामामुळे मार्केट थंडसध्या पावसाने सुरुवात केल्याने शेतीकामांची लगबग सुरू झाली आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील मार्केटवर दिसत आहे. किराणा मालासह इतर दुकाने एकदम शांत झाली आहेत.

कांदा-बटाटा स्थिरया आठवड्यात कांद्याची आवक तुलनेत कमी असली तरी दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. घाऊक बाजारात सरासरी १० रुपये तर बटाटा २० रुपये किलो आहे. लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही, किरकोळ बाजारात ४० रुपये किलो दर आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर