शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोजिमाशि’ सभेत शिवीगाळ, हाणामारी

By admin | Updated: August 25, 2014 00:16 IST

प्रश्न विचारण्यावरून गोंधळ : पोलिसाच्या अंगावर जाणाऱ्या शिक्षकास चोप

कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सभेत प्रश्न विचारण्यावरून सत्तारूढ व विरोधकात एकमेकांना रोखण्याचा प्रयत्न झाल्याने गोंधळ उडाला. शिक्षकांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झालाच; पण विरोधक समजून गोंधळ रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिव्हील ड्रेसवरील एका पोलिसाच्या अंगावर सत्तारूढ गटाच्या समर्थक गेल्याने तणाव निर्माण झाला. दोन तास सुरू असलेला गोंधळ पाहून पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी दम दिल्यानंतर ‘सरांचा’ ताव थोडा कमी झाला. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेची ४४ वी सभा आज, रविवारी शाहू सांस्कृतिक मंदिर, मार्केट यार्ड येथे अध्यक्ष दादासाहेब लाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अहवाल वाचन रोखत काही संचालकांनी सत्तारूढ गटाच्या समर्थक असलेले बिल्ले लावल्याचे निदर्शनास आणून देत ते काढण्याची मागणी मार्तंड दुधाळ यांनी केली. आण्णाप्पा चौगले यांनी मध्येच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि गोंधळास सुरुवात झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सभा पुन्हा सुरू झाली. त्यानंतर कर्जावरील व्याज दर कमी करा, दीपावली भेटवस्तूमध्ये वाढ करा, आदी विषयांवर चर्चा झाली. शेअर्स मर्यादेवर शिवाजी पाटील बोलत असताना माईक घेण्यावरून गोंधळ उडाला. राजेंद्र रानमाळे प्रश्न विचारण्यासाठी उठल्यानंतर त्यांना रोखत विरोधी आघाडीचे तुम्ही नेते आहात, लेखी प्रश्न अगोदर देणे गरजेचे होते, असे अध्यक्ष लाड यांनी टोला हाणला. अहवाल वेळेत मिळाले नसल्याने लेखी प्रश्न देऊ शकलो नसल्याचे सांगत कर्जमुक्ती योजनेला रानमाळे यांनी हात घालत, एका -एका प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली. एकदम प्रश्न विचारा एकदम उत्तरे देतो, आता तुम्ही माईक सोडा, असे लाड यांनी सांगितल्यानंतर गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत गोंधळ रोखण्याचा प्रयत्न केला, पण शिक्षक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. काही सिव्हील ड्रेसमधील पोलीस शिक्षकांना शांत करत असताना विरोधकच आपणाला बोलू देत नाहीत, असे समजून एका शिक्षकाने शिवी देत पोलिसाच्या अंगावर गेल्याने गोंधळात भर पडली. पोलिसांच्या अंगावर हात टाकल्याचे समजताच इतर पोलिसांनी संबंधित शिक्षकांवर झडप टाकत चांगलाच चोप दिला. हा गोंधळ शांत होतो न तोच मुसळे (कुडित्रे) हे प्रश्न विचारण्यासाठी माईककडे जाताना पुढच्या रांगेत बसलेल्या सत्तारूढ समर्थकांनी अपशब्द वापरला. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रा. जयंत आसगावकर व बाबा पाटील यांचे समर्थक गेले. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. शिक्षकांचा गोंधळ व पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार ऐकून शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव सभास्थळी आले आणि शिक्षकांना सुनावल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली. (प्रतिनिधी)