Crime News -तिघांवर गुन्हा : महिलेवर चाकू हल्ला; मार्केटमधून मोबाईल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:51 IST2020-05-04T17:44:04+5:302020-05-04T17:51:59+5:30
या हल्यात कानाजवळ दुखापत झाल्याने त्या जखमी झाल्या. याबाबत त्यांना सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजारामपूरी पोलीस ठाण्यात छाया शिंदे, अजीत शिंदे, संदीप शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Crime News -तिघांवर गुन्हा : महिलेवर चाकू हल्ला; मार्केटमधून मोबाईल चोरी
कोल्हापूर : किरकोळ कारणावरून एका महिलेवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना यादवनगरातील डवरी वसाहतीत घडली. या हल्ल्यात इंदुबाई अशोक चव्हाण (वय ४५, रा. डवरी वसाहत, यादवनगर) ही महिला जखमी झाली. याप्रकरणी एकाच घरातील तिघांवर गुन्हा नोंदविला आहे.
इंदुबाई चव्हाण ही महिला औषध आणण्यासाठी दुकानात जात होत्या. त्याचवेळी त्यांचे किरकोळ कारणांवरून छाया दगडू शिंदे यांच्याशी वादावादी झाली. त्यानंतर छाया शिंदे (वय ५०), त्याची मुले अजित शिंदे (२२) व संदीप शिंदे (३०, सर्व रा. डवरी वसाहत) यांनी चव्हाण यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयीत अजित शिंदे यांनी चिडून त्या महिलेवर चाकूसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला.
या हल्यात कानाजवळ दुखापत झाल्याने त्या जखमी झाल्या. याबाबत त्यांना सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजारामपूरी पोलीस ठाण्यात छाया शिंदे, अजीत शिंदे, संदीप शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भाजी मार्केटमधून मोबाईल चोरी
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील प्रार्थना हॉटेलसमोर रस्त्यावर सुरू असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल हँडसेट चोरीची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी मनोजकुमार कृष्णराव पाटील (वय ४९, रा. १८७५, ई वॉर्ड, ८ वी गल्ली, राजारामपुरी) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.