घरगुती कारणावरून पत्नीवर चाकू हल्ला, पतीवर पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:41 IST2020-08-03T16:40:04+5:302020-08-03T16:41:29+5:30
घरातील वस्तू भावाला का दिलीस? या कारणावरून पतीने पत्नीवर चाकूहल्ला करून जखमी केल्याचा प्रकार रविवारी विश्वशांती चौक, कनाननगरात घडला.

घरगुती कारणावरून पत्नीवर चाकू हल्ला, पतीवर पोलिसांत गुन्हा
ठळक मुद्देघरगुती कारणावरून पत्नीवर चाकू हल्लाकनाननगरातील प्रकार : पतीवर पोलिसांत गुन्हा
कोल्हापूर : घरातील वस्तू भावाला का दिलीस? या कारणावरून पतीने पत्नीवर चाकूहल्ला करून जखमी केल्याचा प्रकार रविवारी विश्वशांती चौक, कनाननगरात घडला.
या हल्ल्यात पत्नी सुनीता दनाने (वय २५, रा. कनाननगर) ही जखमी झाली तर पती करण किशोर दनाने (२७) याच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
सुनीताने भावाला घरातील स्टीलची किटली दिली, या रागातून करण याने आपल्या पत्नी सुनीतावर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला.
हल्ल्यानंतर शिवीगाळ करत पुन्हा मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात त्यांच्या पायावर जखम झाली आहे. याबाबत पती करण दनाने याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.