शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांचे अपहरण करून दमदाटी

By admin | Updated: January 21, 2015 00:31 IST

मुलीची छेड : शिवसेना उपशहर प्रमुखासह चौघांवर गुन्हा

पेठवडगांव : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीचा जाब विचारण्यासाठी दोन भावांचे अपहरण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखासह चारजणांच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात काल, सोमवारी रात्री गुन्हा नोंद झाला.उपशहर प्रमुख सुनील माने, अक्षय माने यांच्यासह अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. परिसरातील पीडित मुलगी शिक्षणासाठी वडगाव येथील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये येते. तिची छेड अंबपवाडी येथील दोन मुलांनी ३१ डिसेंबरला काढली. त्यावेळी या मुलगीचे नातेवाईक व संबंधित मुले यांच्यात बाचाबाची झाली. याप्रकरणी वडगाव पोलिसांत तक्रार नोंद झाली होती. त्यानंतर ‘ती’ मुले व अक्षय माने यांनी मुलीच्या घरी येऊन दमदाटी केली. यावेळी अक्षय माने यास धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे चिडलेल्या अक्षय माने त्याचा चुलत भाऊ सुनील माने, शहरप्रमुख संदीप पाटील, अंकुश माने व अन्य २५ जणांच्या मदतीने जाब विचारण्यासाठी आला. तंटामुक्त अध्यक्षांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. अक्षय माने व त्याच्या साक्षीदारांनी घराजवळ येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित मुलीच्या नातेवाइकांनी शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पीडित मुलीच्या दोन भावांचे सोमवारी कॉलेजमधून दमदाटीने अपहरण केले. त्यास सुनील माने यांच्याकडे नेले. इतर नातेवाइकांना हजर केल्याशिवाय सोडणार नाही, असा त्यांना दम दिला, पण ‘त्या’ मुलाने पूर्वपरीक्षा असल्यामुळे विनंती करून सुटका करून घेतली. उपनिरीक्षक सचिन मिरधे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)