शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

कीकबॉक्सिंग स्पर्धेत जिल्ह्याला १५ सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2015 23:56 IST

कोल्हापूर विभाग : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

चिपळूण : कोल्हापूर विभागीय कॅडेट व सिनियर कीकबॉक्सिंग चॅम्पियनशीप २०१५ या विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन १५ सुवर्ण, २ रौप्य व ३ कांस्यपदकांची कमाई केली असून, कोल्हाूपर विभागाच्या संघात स्थान पक्के केले आहे. सातारा जिल्हा अ‍ॅमॅच्युअर कीकबॉक्सिंग असोसिएशनतर्फे शिवाजी उदय मंडळ, सातारा येथील सभागृहात ही स्पर्धा झाली. सातारा जिल्हा कीकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष वीरभद्र कावडे व अर्जुन जांभळे यांच्या प्रयत्नाने स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेत १० ते १२ वर्षांखालील वयोगटातील पॉर्इंट फाईट प्रकारात मुलांमध्ये २८ किलो खालील वजनी गटात सुदेश म्हामणकर कांस्य, पारस पालांडे ३२ किलो वजनी गटात कांस्य, धीरज गोमले ३७ किलो वजनी गटात रौप्य, अथर्व सुर्वे ४२ किलो वजनी गटात सुवर्ण, आदित्य कदम ४७ किलो वजनी गटात रौप्य, मुलींमध्ये महिका प्रकाश ४२ किलो वजनी गटात सुवर्ण तसेच १५ वर्षांखालील वयोगटातील लाई व काँटॅक्ट प्रकारात मुलांमध्ये संकेत भोसले ३७ किलो वजनी गटात सुवर्ण, कीक लाईट प्रकारात जयवंत जगदाळे ३७ किलो वजनी गटात सुवर्ण, सूर्यकांत आखाडे ३७ किलो वजनी गटात रौप्य, अविनाश माने ४६ किलो वजनी गटात सुवर्ण, पॉर्इंट फाईट प्रकारात ओंकार कदम ४२ किलो वजनी गटात सुवर्ण, नील वेल्हाळ ४६ किलो वजनी गटात सुवर्ण, रिजवान खान सुवर्ण व १९ वर्षांखालील वयोगटात पॉर्इंट फाईट प्रकारात विनोद राऊत ४५ किलो वजनी गटात सुवर्ण, योगिता खाडे ६० किलो वजनी गटात सुवर्ण, कीक लाईट प्रकारात हुजैफा ठाकूर सुवर्ण, योगिता खाडे सुवर्ण, लाईट कॉटॅक्ट प्रकारात मंदार साळवी ५७ किलो वजनी गटात सुवर्ण, के-१ प्रकारात हुजैफा ठाकूर कांस्य, लो कीक प्रकारात विनोद राऊत सुवर्ण, फुल कॉटॅक्ट प्रकारात मंदार साळवी सुवर्ण यांनी यश मिळविले. सुवर्णपदकप्राप्त खेळाडूंची कोल्हापूर विभाग संघातून २५ ते ३० आॅगस्टला पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅडेट व सिनिअर कीकबॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ते सहभागी होतील. संस्थाध्यक्ष अजित खाडे, प्रमुख मार्गदर्शक योगिता खाडे, सुयोग सावंत, मंगेश माटे, मुनिश जैतपाल व उदय देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले. (प्रतिनिधी)