शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

दख्खनचा राजा जोतिबाची पाकळ्यातील खडी पूजा, भाविकांची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 5:52 PM

कोल्हापूर- दख्खनचा राजा जोतिबाची आज पाच पाकळ्यातील खडी पूजा बांधण्यात आली आहे.

कोल्हापूर- दख्खनचा राजा जोतिबाची आज पाच पाकळ्यातील खडी पूजा बांधण्यात आली आहे. आज रविवार असल्याने जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी उसळली होती. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या जोतिबा यात्रेला कामदा एकादशीपासून सुरुवात होते. नवरात्रीतही जोतिबाची पूजा बांधण्यात येते. जोतिबाच्या यात्रा काळात डोंगरावर असंख्य भाविकांची गर्दी असते. यात्रेआधीच भाविकांची डोंगरावरील ये-जा दिसू लागली आहे. जोतिबा डोंगराच्या दिशेने जाताना घाटात काही ठिकाणी स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी छत उभारणीच्या कामात व्यस्त असतात. डोंगरावर तलावाच्या सभोवतलाच्या परिसरात पार्किंगचे नियोजन असते. काही ठिकाणी एस. टी.सह अन्य मोठ्या वाहनांसाठी सपाटीकरण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून डोंगरी विकास कार्यक्रम आणि दत्तक ग्राम योजनेतून रस्ता रुंदीकरण - डांबरीकरणाचे कामही झाले आहे. याचबरोबर मंदिरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणही सुरू होते. या मार्गावर दोन्ही बाजूला दुकानांसाठी छत उभारणी केली जात होती.शिवाय मंदिर परिसरात दर्शन रांगांसाठी बॅरिकेटिंग आणि दर्शनासाठी ब्रीजची व्यवस्था केली जात असल्याचे दिसले. दुसरीकडे मंदिराच्या आवारातील उखडलेल्या फरशांमध्ये सिमेंट भरून त्याची दुरूस्ती केली जात होती. काही दुकानदारांकडून साहित्याची मांडणी सुरू होती. काही दुकानदार गुलालाची पोती आणताना दिसले. चैत्र यात्रेनिमित्त नारळ, गुलाल-खोबरे, मेवा मिठाईचे व्यापारी डोंगरावर दाखल झाले आहेत. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात नारळाचे ट्रकही डोंगरावर दाखल झाले आहेत. मंदिरात देवाचे दागिने, चांदीचे प्रभावळ स्वच्छ करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. दरवर्षी डोंगरावर यात्रा काळात भाविकांची संख्या वाढते. गेल्या वर्षी काहीशी दुष्काळाची स्थिती असल्याने भाविकांची संख्या चार लाखांपर्यंतच होती. यंदा मात्र ५ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाचा आहे.