शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हर फ्लो'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:12 PM

Dam Rain Kolhapur : खामकरवाडी -अवचितवाडी दरम्यान आसलेला खामकरवडी लघूपाठबंधारे प्रकल्प रविवारी मध्यरात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.

ठळक मुद्देसांडव्यातुन पाण्याचा विसर्ग पावसाचा जोर ओसरला

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : खामकरवाडी -अवचितवाडी दरम्यान असलेला खामकरवडी लघूपाठबंधारे प्रकल्प रविवारी मध्यरात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी तुळशी नदीपात्रात मिसळल्याने नदी पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर धरणाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या विहंगम पाण्याचे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी धरणस्थळावर होत आहे.गेल्या आठ ते दहा दिवसा पासून जिल्हयात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठया धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. तर तालुक्यातील छोटया -मोठ्या प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे . काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत .जुनच्या पहिल्याच आठवडयापासून पावसाने दमदार एंट्री केल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून रोप लागणीच्या कामाला सुरवात झाली आहे.खामकरवाडी ( ता. राधानगरी ) येथील अवचितवाडी व खामकरवाडी या दोन गावासाठी वरदान ठरणारा प्रकल्प जुनच्य पंधरवडयात प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. या अगोदर हा प्रकल्प जुलै अखेर अथवा ऑगस्टमध्ये भरत होता. पण या हा प्रकल्प प्रथमतःच इतक्या लवकर भरल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

गतसाली हा प्रकल्प लवकरच कोरडा पडल्याने शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तिव्र बनला होता . पण गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू झाल्याने कोरडा पडलेला प्रकल्प रविवारी मध्यरात्री अकरा वाजलेच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने भरला.

या प्रकल्पात११६२ .७८ सहस्त्र घनमीटर इतका पाणी साठा होत असुन या दोन गावातील लोकांच्या पिण्याचा पाण्यासह शेती सिंचनासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गातुन मोठे समाधान व्यक्त होत आहे . 

टॅग्स :DamधरणRainपाऊसkolhapurकोल्हापूर