शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Kolhapur: केशवराव भोसले नाट्यगृह आहे त्या स्थितीत उभारणार, सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 13:20 IST

शाहू छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली समिती, आचारसंहितेपूर्वी निविदा काढण्याचा आग्रह

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग चटका लावणारी आहे. ती ऐतिहासिक वास्तू ‘आहे त्या स्थितीत’ पुन्हा उभी करावी ही लोकभावना आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक काढले, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी २० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. आता ही वास्तू केशवराव भोसले यांच्या जयंतीपूर्वी वर्षभरात पूर्ण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. बांधकामावर शासन देखरेख करेल, परंतु खासदार शाहू छत्रपतींच्या अध्यक्षतेखालील शासकीय समिती दबावगट म्हणून काम करेल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृहावर सोमवारी खासदार शाहू छत्रपतींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. शाहू छत्रपतींनी प्रास्ताविक करताना बैठकीचा हेतू स्पष्ट केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, व्ही. बी. पाटील, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, ॲड. महादेवराव आडगुळे, अभिनेता आनंद काळे यांनी मनोगत व्यक्त केले.पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, आयुक्तांनी २५ कोटी रुपयांचा अंदाज काढला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनीही त्याची खात्री दिली आहे, मात्र हा निधी मिळवण्यासाठी निविदा, त्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती, डीपीआर, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता या प्रक्रियेची पूर्तता करावी लागेल. निधीला आचारसंहितेचा अडथळा आहे. त्यातून मार्ग काढूया. सात दिवसांत शॉर्ट टेंडर काढण्यासाठी आयुक्तांना सूचना देतो, त्यापूर्वी एकमताने निश्चित केलेल्या आर्किटेक्टकडून काम सुरू करून घेऊया, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी सर्वांनी केलेल्या सूचनांचा विचार केला जाईल. या वास्तूत सामान्य व्यक्तींचाही आत्मा आहे. त्यामुळे सरकारी निधी कमी पडला तर जनतेने निधी देणे गैर नाही. शाहू महाराजांचा पुतळाही लोकवर्गणीतून उभा राहिला होता. शंभर वर्षांपूर्वीच्या या वास्तूचा मूळ ढाचा कायम ठेवून तो पुढची १३५ वर्षे कसा टिकेल, याचा विचार करून याचे बांधकाम करा, यासाठी कलाकार, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, तज्ज्ञांचा विचार घ्या, शाहू महाराज असते तर त्यांनीही पुढचा विचार केला असता, ते काम एक वर्षात होणार नाही, हा पोरखेळ नाही, त्यामुळे शासकीय समिती व्हावी, आपण वॉचडॉग म्हणून काम करूया.माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शाहूंचा वारसदार म्हणून ओळख असली तरी खासदार म्हणून सहा वर्षांपासून रायगड संवर्धन जतन समितीचे अध्यक्षपद, संसदेतील संवर्धन समितीवर काम केले आहे. त्यामुळे संवर्धन, जतन आणि संरक्षण या तीन मुद्द्यांवर बांधकाम करायचे आहे, हे जाणून घ्या. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट प्रकाशित करा, काॅन्झर्वेशन आर्किटेक्ट नेमा, शाहूंच्या वास्तूत सिमेंटचे बांधकाम झाले, तसे करू नका. दूरदृष्टी मांडणारे आर्किटेक्ट, कलाकार, आमदार, खासदार यांची योग्य समिती स्थापन करा, माझाही अनुभव कामी येईल. शाहू महाराज रोमला गेले ते पाहूनच त्यांनी नवीन तंत्रज्ञान इथे आणले, त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान वापरा, इकाॅस्टिक्स चुकले तर कलाकारांना उपयोग होणार नाही.टक्केवारी चालणार नाही - संभाजीराजेनाट्यगृह उभारणी हा आपल्या सर्वांसाठी जिव्हाळ्याचा तसेच भावनिक विषय आहे. त्यामुळे या प्रक्रियेत टक्केवारी चालणार नाही, तसे झाले तर गाठ माझ्याशी आहे, असा शब्दात संभाजीराजेंनी ठणकावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीHasan Mushrifहसन मुश्रीफ