Karvirkanya Kasturi Sawekar will slap Everest on Everest. The only one from Kolhapur | करवीरकन्या कस्तुरी सावेकर एव्हरेस्टवर तिरंगा फडकविणार । कोल्हापुरातून एकमेव
करवीरकन्या कस्तुरी सावेकर एव्हरेस्टवर तिरंगा फडकविणार । कोल्हापुरातून एकमेव

ठळक मुद्दे रोज बारा तास सराव

संदीप आडनाईक ।

कोल्हापूर : ती एकुलती एक. वय अवघे १८ वर्षे. वडील मेकॅनिक; पण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून १३७ सह्याद्रीतील दरीकपारी तुडवित कोल्हापूरची कस्तुरी दीपक सावेकर मार्च महिन्यात जगातील सर्वोच्च अशा माउंट एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा ध्वज रोवण्याची जिद्द बाळगून रोज बारा तास अथक सराव करत आहे.

मंगळवार पेठेतील कस्तुरी चाटे ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सची बारावीची विद्यार्थिनी आहे. आर्मी आॅफिसर होण्याचा मनोदय असलेल्या कस्तुरीला सहावीत असल्यापासूनच जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्टची (उंची २९ हजार २८ फूट) ओढ होती. शिक्षणात गॅप घेऊन यंदा ती फेब्रुवारीपासून रोज बारा तास सराव करत आहे. ७० दिवसांच्या या मोहिमेसाठी ४२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. २४ मार्च रोजी ती कोल्हापुरातून प्रस्थान करणार असून, २८ रोजी प्रत्यक्ष चढाईला सुरुवात करणार आहे. ४० ते ६० डिग्री तापमानात तिला चढाई करावी लागणार आहे; कारण तेथे नियमित १५० ते २०० किलोमीटर वेगाने वारा वाहतो. या टप्प्यात दोन डेथ झोन आहेत. दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत केल्यास हा पहिलाच धाडसी प्रयत्न पूर्णत्वास जाणार आहे. तिच्यासोबत महाराष्ट्रातील सहाजण सहभागी होणार आहेत.

यांचे आहे सहकार्य
तिच्या या मोहिमेत कोल्हापूरच्या करवीर हायकर्स आणि पुण्याच्या गिरिप्रेमी गिर्यारोहण संस्थेने संपूर्ण तांत्रिक सहकार्य देऊ केले आहे. प्राणायाम, योगासाठी वीणा मालदीकर, जीमसाठी आनंदा डाकरे आणि विजय मोरे, सायकलिंगसाठी अनिल भोसले, विक्रम कुलकर्णी, किशोर कारंडे हे प्रशिक्षक सज्ज आहेत. तसेच जलतरणसाठी, आठवड्यातून एक दिवस कुशिरे ते जोतिबा आणि परत असे ६० किलोमीटरचे अंतर पाठीवर २५ किलोचे वजन घेऊन ती धावत पार करते. एव्हरेस्टवरील वातावरणात आॅक्सिजनसह ३५ किलो वजन पेलावे लागणार आहे, त्याची तयारी ती करत आहे.


प्रशिक्षण आणि पुरस्कार


कस्तुरीने यशस्वी
केलेल्या मोहिमा
कातळधार धबधबा रॅपलिंग, कळसुबाई, गोरखगड, सिद्धगड, प्रतापगड, कलावंतीणीचा सुळका, साल्हेर, सालोटा, मोरामुल्हेर, हरगड, नळीची वाट, लिंगाणा, कळकराय सुळका, हरिश्चंद्रगड, किल्ले अलंग मदन, कुलंग, तर हिमालयातील डॉ. बी. सी. राय पीक (उंची १८ हजार फूट), क्षितिदार बेस कॅम्प (उंची १५ हजार ७०० फूट), संदकफू शिखर (११९२९ फूट), विशाळगड येथे झीप लाईन व्हॅली क्रॉसिंग, विशेष म्हणजे एप्रिल नेपाळमधील माउंट मेरा पीक (उंची २१ हजार २४६ फूट) ही मोहीम तिने १२ दिवसांत पूर्ण केली आहे.


 


2017
हिमालयीन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंग येथे तीन सुवर्णपदके, युथ इन्स्पिरेशनल अवॉर्ड


2018'
मनाली येथे मूलभूत, परिपूर्ण प्रशिक्षण

Web Title: Karvirkanya Kasturi Sawekar will slap Everest on Everest. The only one from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.