करवीर तालुक्यात पाणीवाटपात राजकारण ! ऊस लागणी थंडावल्या .. हंगाम रेंगाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:13 IST2019-11-27T15:12:20+5:302019-11-27T15:13:51+5:30
गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस पीक वसुली शेतकऱ्यांनी रोखाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे .

करवीर तालुक्यात गेली महिनाभर शेतीला पाणी मिळत नसल्याने ऊस लागणीची कामे पाण्याअभावी थंडावली !
सावरवाडी : गेल्या महिनाभर ऊसपीकांना पाणी नसल्याने करवीर तालुक्यात पाण्याअभावी ऊस लागणीची कामे थंडावल्या आहेत . पाणीच मिळत नसल्याने भात पिकांच्या क्षेत्रातील ऊस लागणीचा हंगाम रेंगाळला आहे सहकारी तत्वावर चालणाऱ्या अनेक गावातील पाणीपुरवठा संस्था या ठराविक राजकिय गटाच्या असल्यामुळे इतर गटातील शेतकऱ्यांची ऊस पीके वाळवून टाकतात . त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस पीकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते .
गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस पीक वसुली शेतकऱ्यांनी रोखाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे .ऊस लागणी थांबल्याने पुढील ऊस गळीत हंगामात ऊस टंचाई भासणार आहे . पाणीपुरवठा संस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेढीस धरून ऊस पीके वाळवू लागले आहे . ऊस पिकाला पाणी नाही तर सहकारी पाणी संस्था ग्रामीण भागातील बंद कराव्यात या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे .
- पाणीवाटपात राजकारण !
ग्रामीण भागात पाणीपुरवठा संस्था या राजकिय गटात विखुरल्या आहेत .पिकांना पाणी वाटपात राजकिय हस्तक्षेप करतात, पीके वाळवितात, . त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे . पाणीपुरवठा संस्था रद्द करून शेतकऱ्यांना पाणी उपसा परवाने द्यावे अशी मागणी होऊ लागली .