शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

‘करवीर’चे कोल्हापुरात तर इतर तालुक्यातच मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’साठी रविवारी (दि. २) मतदान होत असून जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर त्याचे नियोजन केले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’साठी रविवारी (दि. २) मतदान होत असून जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर त्याचे नियोजन केले आहे. करवीर तालुक्याचे मतदान कोल्हापुरातील न्यू मॉडेल स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज (विवेकानंद कॉलेज) थे तर इतर ठिकाणचे मतदान तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.

‘गोकूळ’साठी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदानाची तयारी निवडणूक यंत्रणेने सुरू केली आहे. मागील निवडणुकीत जिल्ह्याचे मतदान एकाच ठिकाणी झाले होते. मात्र काेरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या ठिकाणी मतदान घेण्याचे नियोजन निवडणूक यंत्रणेने केले आहे. त्यानुसार करवीरचे कोल्हापूर शहरातील न्यू मॉडेल स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये होणार आहे. इतर तालुक्यातील मतदान तेथील शाळा, महाविद्यालयात होणार आहे. सर्वाधिक सहा केंद्रे करवीर तालुक्यात असून राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यात प्रत्येकी चार केंद्रे आहेत.

बहूद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी

‘गोकूळ’ची मतमोजणी ४ मे रोजी रमणमळा येथील शासकीय बहूद्देशीय हॉल येथे एकत्रित केली जाणार आहे.

येथे होणार मतदान -

तालुका ठिकाण

गगनबावडा माधव विद्यालय, गगनबावडा

हातकणंगले आदर्श इंग्लिश मीडियम हातकणंगले

शिरोळ पद्माराजे हायस्कूल, शिरोळ

राधानगरी राजर्षी शाहू विद्यामंदिर, राधानगरी

गडहिंग्लज एम. आर. हायस्कूल, गडहिंग्लज

शाहूवाडी शाहू हायस्कूल, शाहूवाडी

पन्हाळा कुमार विद्यामंदिर, पन्हाळा

आजरा व्यंकटराव हायस्कूल, आजरा

करवीर न्यू मॉडेल स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर

भुदरगड शाहू कुमार भवन, गारगोटी

चंदगड कुमार विद्यामंदिर, चंदगड

कागल जवाहर नवोदय विद्यालय, कसबा सांगाव रोड कागल