शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 7:45 PM

Religious Places, temple, river, kolhapurnews श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. गुरुनानक जयंतीची  सुट्टी असलेने श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात भाविकांनी व दत्त देव संस्थानने कृष्णाकाठी लावलेल्या असंख्य दिव्याने मंदिर परिसर उजाळून निघाला.

ठळक मुद्देअसंख्य दिव्याने कृष्णाकाठी मंदिर परिसर उजाळला श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी - श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. गुरुनानक जयंतीची  सुट्टी असलेने श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात भाविकांनी व दत्त देव संस्थानने कृष्णाकाठी लावलेल्या असंख्य दिव्याने मंदिर परिसर उजाळून निघाला.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पौर्णिमा व सुट्टी असलेने हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी व कार्तिक पौर्णिमा स्नानासाठी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात मंदिर परिसरात दत्त देव संस्थानने व भाविकांनी कृष्णा-पंचगंगा काठावर लावलेल्या असंख्य दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला.पौर्णिमेनिमित्य येथील मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी आठ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी साडेबारा वाजता श्रींचा चरणकमलावर महापूजा, तीन वाजता पवमान पंचसूक्त पठण, रात्रो साडे आठ वाजता धूप,दिप, आरती व पालखी सोहळा होवून शेजारती असे कार्यक्रम झाले.

येथील दत्त देव संस्थान मार्फत कापडी मंडप,  दर्शनरांग, मुखदर्शन,पिण्यासाठी शुद्ध पाणी, तसेच कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये यासाठी ठीक ठिकाणी स्यानिटायझर, थर्मल टेस्ट, सीसी टीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुरक्षा रक्षक, ब्यारेकेटिंग आदि सोय केली होती. दत्त दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविक पायी, दुचाकी, चारचाकी वाहनाने श्रींच्या दर्शनासाठी येत होते. आज कार्तिक स्नान समाप्ती असलेने भाविकांनी व महिलांनी कृष्णा-पंचगंगा नदीच्या काठावर पर्वकाल स्नानाचा लाभ घेतला. सायंकाळी पाच नंतर मुख्य मंदिराच्या दक्षिणोत्तर घाटावरती भाविकानी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्य दिवे लावण्यास सुरवात केली.भाविकांनी कृष्णा काठची काकडी, वांगी तसेच पेढे, बर्फी,मेवा-मिठाई खरेदी साठी गर्दी केली.रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव व भाविकांची वर्दळ चालू होती.ग्रामपंचायत व दत्त देव संस्थान मार्फत भाविक व यात्रेकरुंसाठी विविध सोयी व सुविधा उपलब्ध करून देणेत आल्या होत्या. पोलिस यंत्रणेकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.  चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कोरोना महामारी मूळे मंदिर दर्शनासाठी बंद असलेने आठ महीने दत्त दर्शनासाठी प्रतीक्षेत असणार्‍या भाविकांनी कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधत श्री दत्त दर्शन घेतले.   भाविकांच्यात जागृतता झ्र कोरोना विषाणू चा प्रसार होवू नये यासाठी काही निर्बंध घालून मंदिर दर्शनास परवानगी मिळालेने भाविकांनी मास्क, सुरक्षित अंतर, स्यानिटायझर याचा वापर करून श्री दत्त दर्शनासाठी हजेरी लावली.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूरTempleमंदिर