गावच्या वेशीवर मुलीचा फोटो, हळद-कुंकू, लिंबूचे उतारे; कोल्हापुरातील बालिंगा पाडळीमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 17:10 IST2022-12-16T16:52:29+5:302022-12-16T17:10:33+5:30
ग्रामस्थांमध्ये पसरले भितीचे वातावरण

गावच्या वेशीवर मुलीचा फोटो, हळद-कुंकू, लिंबूचे उतारे; कोल्हापुरातील बालिंगा पाडळीमधील प्रकार
प्रकाश पाटील
कोपार्डे : शहरा पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पाडळी खुर्द ता. करवीर गावच्या वेशीवर मुलीचा फोटो, हळद, कुंकू लिंबू, सुया, काळ लावून वेशीवर उतारे पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत असून अशा याला नेमका आळा घालायचा कसा असा प्रश्न समोर उभा आहे.
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गाव राजकीय व क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यातील नावाजलेले गाव आहे. कोल्हापूर शहराचा विस्तार पुईखडी, रिंगरोड बाजूला शहराचा वाढत्या विस्तारामुळे गावाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. याच गावात काही दिवसापासून करणीचे प्रकार वाढले आहेत.
करणीमध्ये मुलीच्या फोटोचा वापर केला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे पालकांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छ.शाहू महाराजाच्या पुरोगामी जिल्ह्यात असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे. हा वशीकरणासाठी केलेला अंधश्रद्धा अघोरी प्रकार असल्याने ग्रामस्थांनी लक्ष घातले आहे.