कदमवाडीत घरफोडी, दीड लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:38 IST2019-05-15T19:37:51+5:302019-05-15T19:38:53+5:30
ओम निसर्ग अपार्टमेंट लक्ष्मीनारायण नगर, कदमवाडी येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने दीड लाखाचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याचे मंगळवारी उघडकीस आले.

कदमवाडीत घरफोडी, दीड लाखाचा ऐवज लंपास
ठळक मुद्देकदमवाडीत घरफोडी, दीड लाखाचा ऐवज लंपास शाहूपुरी पोलिसांत फिर्याद
कोल्हापूर : ओम निसर्ग अपार्टमेंट लक्ष्मीनारायण नगर, कदमवाडी येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने दीड लाखाचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याचे मंगळवारी उघडकीस आले.
पोलिसांनी सांगितले, जबीन अब्दुलकरीम मुल्ला (वय २८, रा. पेठ, ता. वाळवा) हे नोकरीनिमित्त कदमवाडी येथे फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने बेडरूममधील कपाटातील सोन्याचा
राणी हार, नेकलेस, रिंगा, पैंजन, इस्त्री, बांगड्या आदी ऐवज लंपास केल्याचे निदर्शनास आले. मुल्ला यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करीत आहेत.