शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

कागलकरांच्या डोळ्यांना जुबेदा-जरिनाची ‘नजर’

By admin | Updated: October 16, 2015 22:37 IST

कागलशी ऋणानुबंध : आठवडी बाजारात ४0 वर्षांपासून चष्मे-गॉगलची विक्री-दुरुस्ती

जहाँगीर शेख -कागल È-येथील आठवडी बाजार म्हणजे बहुमिश्र संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. या बाजाराचे आणि येथे येणारे छोटे-मोठे विक्रेते यांच्यातील ऋणानुबंध अर्धशतकाच्याही पुढे जाऊन पोहोचले आहेत. एक विशिष्ट जागा आणि हे विक्रेते असे समीकरणच झाले आहे. गडहिंग्लज येथे राहणाऱ्या आणि नेहमी हैदराबादी पेहराव्यात असणाऱ्या चष्मे-गॉगल दुरुस्ती-विक्री करणाऱ्या जुबेदा आणि जरिना इराणी या बहिणींचेही या कागलच्या आठवडी बाजाराशी गेली ४० वर्षे ऋणानुबंध तयार झाले आहेत. शाहूनगर वाचनालयासमोरील गेटजवळ एका लाकडी खोक्यावर सुटकेस उघडी ठेवून थाटलेले चष्मे-गॉगल दुरुस्तीचे हे दुकान आणि त्यांच्या शेजारी हैदराबादी परिसरातील महिला परिधान करतात असे सलवार कमीज परिधान करून उभ्या असलेल्या जुबेदा आणि जरिना गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ हे चित्र कागल आणि परिसरातील लोक पाहत आलेले आहेत. जुबेदा सिकंदर इराणी आणि जरिना मेहबूब इराणी या सख्ख्या बहिणी आता साठीकडे पोहोचल्या आहेत. वयाच्या १६ व्या वर्षांपासून त्या दर सोमवारी कागलच्या बाजारासाठी येतात. त्यांचा वडिलोपार्जित चष्मे दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय आहे. पूर्वी वडील आणि पती हा व्यवसाय करीत. वडिलांनंतर थोरली बहीण जुबेदा कागलला येऊ लागली. त्यातच पतीच्या निधनानंतर बाळाला कडेवर घेऊन जरिनाही कागलला येऊ लागली. त्यांचा हा जीवन प्रवास आजही कागलकरांच्या ऋणानुबंधाने सुरू आहे. आज शहरात सात ते आठ अद्ययावत चष्मा विक्री व दुरुस्तीची दुकाने आहेत. मात्र, दहा ते पंधरा वर्षांपूर्वी एखाद दुसरे, तर वीस वर्षांपूर्वी चष्मा दुरुस्तीचे एकमेव दुकान म्हणजे या इराणी बहिणीच होत्या. १९७०च्या दशकातील गॉगलची फॅशन तसेच नंबरचे चष्मे वापरण्याचे वाढलेले प्रमाण असताना त्याकाळी त्या ‘नळकांडी’सारख्या मशीनचा वापर करून चष्म्याचा नंबर काढून देत होत्या. नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर त्याचा वापर बंद झाला. या बहिणींचे कागलच्या आठवडी बाजाराशी एक वेगळेच ऋणानुबंध तयार झाले आहेत. ज्या काळात कागलमध्ये चष्माचे नंबर काढून देणारे, दुरुस्ती-विक्री करणारे दुकान नव्हते, तेव्हा या बहिणींनीच असंख्य लोकांना नेत्रसेवा दिली आहे. बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना कधीही फसवले नाही. प्रामाणिकपणे त्यांनी व्यवसाय जपला आहे. आता माझे वय ७० आहे. मी आठवीत असल्यापासून या दोघींना पाहतो आहे. - एन. डी. जाधव ज्येष्ठ नागरिक, कागलदीडशे ते दोनशे वर्षांपूूर्वी इराणी कुटुंबाचा कोणीतरी भारतात येऊन हा चष्मे दुरुस्ती, विक्रीचा व्यवसाय करीत होता. मुस्लिम शिया पंथीय असणारे लोक पारसी भाषा बोलतात. ४आता त्यांची जवळपास ३५ कुटुंबे गडहिंग्लज येथे स्थायिक आहेत. या दोघी बहिणींनी या व्यवसायावर फार प्रगती केली नाही; पण कुटुंबांचा चरितार्थ चालविला. मुलांना मोठे केले. जुबेदा यांना तीन मुले, तर जरिना यांना दोन मुले आहेत.कागलचा वाईट अनुभव आलाच नाहीमुलाखतीदरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना जरिना इराणी म्हणाल्या की, ऐन तरुण वयात लहान बाळ कडेवर घेऊन मी येथे येत असे. मात्र, कधीही भीती वाटावी अथवा लाज वाटावी, अशी वागणूक आम्हाला मिळाली नाही. ग्राहक म्हणून पिढ्या बदलल्या; पण आम्हाला सन्मानाचीच वागणूक मिळाली आहे.