शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कागल नगराध्यक्षपद मुश्रीफ गटाकडेच, समरजित घाटगे 'तुतारी' ऐवजी राजर्षी शाहू आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:49 IST

Local Body Election: राजकीय समीकरण बदलले : मंडलिक, संजय घाटगे यांना धक्का

कागल : कागल नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या उलथापालथी होत गेल्या. दोन विधानसभा निवडणुकीत टोकाचा संघर्ष करीत असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे एकत्र आले आहेत. मंत्री मुश्रीफ यांना नगराध्यक्षपद व तेरा जागा, तर समरजित घाटगे यांना उपनगराध्यक्ष व दहा जागा असे सत्तावाटपाचे सूत्र ठरल्याचे समजते.नगराध्यक्षपदासाठी जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांच्या पत्नी सविता माने यांना युतीच्या वतीने निश्चित केले आहे. समरजित घाटगे गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हाऐवजी राजर्षी शाहू आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.या दोघांच्या युतीविरुद्ध प्रा. संजय मंडलिक (शिवसेना शिंदे) गट लढणार आहे. या प्रक्रियेत माजी आमदार संजय घाटगे गटाला डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले, तर शिवसेना (उबाठा) व राष्ट्रीय काँग्रेस यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कायम आहेत. अपक्ष उमेदवारांचेही अर्ज आहेत. मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातील या युतीने शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. कागल नगरपालिका आवारात मंत्री मुश्रीफ व राजे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी भय्या माने यांच्या निवासस्थानी मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तेथे गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, भय्या माने यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

गेली आठवडाभर चर्चागेली आठवडाभर या युतीची चर्चा सुरू होती. समरजित घाटगे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि चारही नेते मिळून महायुती करतील अशी चर्चा होती. मात्र दुसऱ्या बाजूला मंत्री मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे एकत्र येणार व विरोधात समरजित घाटगे व संजय मंडलिक लढणार असे चित्र समोर येत होते. तशी बोलणीही झाली होती. मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी आपल्यामध्ये अशी युती होणार नसल्याचेच स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे कार्यकर्ते व प्रमुख नेतेही या घडामोडीपासून अनभिज्ञ होते.इच्छुकांची घालमेलअनेकांच्या चेहऱ्यावर या युतीने आश्चर्याचे भाव उमटले होते. सकाळपासून जो तो माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होता. उमेदवारीचा शब्द मिळालेल्या कार्यकर्त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी घालमेल सुरू होती.मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार?मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यात युती घडविण्यासाठी मुंबईत चर्चा झाल्या व त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा सुरू आहे. दुपारी १२ वाजता संजय घाटगे कागलमधील एका संस्थेत आले. तेथे प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करीत असतांना त्यांना भाजप वरिष्ठ नेत्यांचा फोन आला. त्यानुसार त्यांच्याकडे असलेले भाजपचे एबी फाॅर्म परत घेण्यात आले. मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे मंगळवारी (दि. १८) कागलमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत.

इतर पक्षांचे उमेदवारसंजय मंडलिक गटाने दुपारी शिवसेना शिंदे गटाकडून सर्व जागा लढविणार असल्याचे जाहीर केले. शिवसेना उबाठाच्या वतीने दहा जागी नगरसेवक पदासाठी, तर एक नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आहे. काँगेसच्या वतीने सहाजागी नगरसेवकपदाचे, तर एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mushrif group retains Kagal Nagaradhyaksha post; Ghatge to contest on Rajarshi Shahu Aghadi symbol.

Web Summary : Hasan Mushrif and Samarjit Ghatge unite for Kagal Nagarapalika election. Mushrif gets Nagaradhyaksha post, Ghatge, deputy. They will contest against Mandaliks group. Fadnavis mediated the alliance.