ज्योती सुतारचा जिल्हा युवा क्रीडा पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST2021-02-07T04:22:25+5:302021-02-07T04:22:25+5:30

महाविद्यालयाची खेळाडू ज्योती सुतार हिने आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत भारतीय विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत सहभाग नोंदविला. अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत फेन्सिंग ...

Jyoti Carpenter honored with District Youth Sports Award | ज्योती सुतारचा जिल्हा युवा क्रीडा पुरस्काराने सन्मान

ज्योती सुतारचा जिल्हा युवा क्रीडा पुरस्काराने सन्मान

महाविद्यालयाची खेळाडू ज्योती सुतार हिने आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत भारतीय विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत सहभाग नोंदविला. अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत फेन्सिंग (तलवारबाजी) क्रीडा प्रकारात ब्राँझपदक पटकाविले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय तर्फे दिला जाणारा जिल्हा युवा क्रीडा पुरस्कार सुतार हिला देण्यात आला. शेखर पाटील याने हरिद्वार (उत्तराखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिसबाॅल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला तृतीय क्रमांक मिळाला.

कार्यक्रमास उपाध्यक्ष विलास नाईक, सचिव रमेश कुरुणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यासह सर्व संचालक, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले, पर्यवेक्षक मनोज देसाई, क्रीडा संचालक डॉ. धनंजय पाटील, अल्बर्ट फर्नांडीस यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. धनंजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले. अल्बर्ट फर्नांडीस यांनी आभार मानले.

फोटोकॅप्शन ०६ आजरा ज्योती सुतार

आजरा महाविद्यालयात ज्योती सुतार हिचा सत्कार अशोकअण्णा चराटी यांनी केला. शेजारी डाॅ. अशोक सादळे, प्रा. राजीव टोपले, डॉ. धनंजय पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Jyoti Carpenter honored with District Youth Sports Award