शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गुरू-शनी महायुती दर्शनाची अजूनही आठवडाभर संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:21 IST

डिसेंबरचे अवकाश निरभ्र : खगोलप्रेमींसाठी पर्वणी कोल्हापूर : सूर्यास्तानंतरच्या आकाशात पश्चिमेला क्षितिजाच्या थोडे वर आलेल्या ‘गुरू- शनी या तेजस्वी ...

डिसेंबरचे अवकाश निरभ्र : खगोलप्रेमींसाठी पर्वणी

कोल्हापूर : सूर्यास्तानंतरच्या आकाशात पश्चिमेला क्षितिजाच्या थोडे वर आलेल्या ‘गुरू- शनी या तेजस्वी ग्रहांच्या महायुती’च्या दर्शनाची संधी खगोलप्रेमींसाठी अजून आठवडाभर उपलब्ध असणार आहे. तब्बल ३९७ वर्षांनी या अतिशय दुर्मीळ खगोलीय घटनेचा साध्या डोळ्यांनी लाभ घेता येत आहे.

अवकाशातील या नाट्यमय घडामोडी पाहणाऱ्यांसाठी सोमवारची सायंकाळ म्हणजे एक पर्वणी ठरली. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आल्याचा भास पाहणाऱ्यांना झाला. हे दोन ग्रह परस्परांपासून फक्त ०.१ अंश (सहा मिनिटे सहा आर्कसेकंद) इतक्या कमी अंतरावर म्हणजे ७३५ मिलियन किलोमीटर अंतरावर आले आहेत.

अजूनही येत्या आठवड्याभर सूर्यास्तानंतर लगेचच निरीक्षण केल्यास या अवकाशनाट्याचा आनंद मनमुरादपणे घेता येणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक किरण गवळी आणि डॉ. राजेंद्र भस्मे यांनी दिली. सोमवारी (दि. २१) त्यांनी चंबुखडीच्या टेकडीवर दुर्बिणीतून तसेच साध्या डोळ्यांनी या दुर्मीळ युतीच्या दर्शनाचा कार्यक्रम घेतला होता. त्याचा लाभ डॉ. किरण भिंगार्डे ,डॉ. किरण जोशी, ‘आयटीआय’चे प्राचार्य मुंडासे यांच्यासह कोल्हापुरातील २०० खगोलप्रेमींनी घेतला.

कोट

गुरू आणि शनी या दोन ग्रहांची सध्या अवकाशात युती झाली. या दोन ग्रहांमधील अंतर जवळपास ४०० प्रकाशवर्षांनी सर्वांत कमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे अंतर सातत्याने कमी होत आहे. सोमवारी हे अंतर सर्वांत कमी म्हणजे अवघे ०.१ अंश इतके झाले; त्यामुळे उघड्या डोळ्यांना हे दोन्ही ग्रह एक झाल्याचा आभास झाला.

- डॉ. राजेंद्र भस्मे

खगोल निरीक्षक, कोल्हापूर.

महायुतीचे दर्शन आता थेट साठ वर्षांनी

ही अनोखी महायुती सूर्यास्तानंतर रात्री आठ वाजेपर्यंत दिसली. २१ डिसेंबरला उत्तर गोलार्धात सूर्य दक्षिणेकडे मकरवृत्तापर्यत पोहोचला. सोमवारची रात्र सर्वांत मोठी म्हणजे १२ तास ५५ मिनिटांची; तर दिवस सर्वांत लहान म्हणजे ११ तास पाच मिनिटांचा होता. आता सूर्य उत्तरेकडे सरकू लागेल आणि २१ मार्चला तो विषुववृत्तावर असेल. त्यानंतर आणखी उत्तरेकडे सरकून सूर्य २१ जूनला कर्कवृत्ताजवळ पोहोचेल. या दिवशी उत्तर गोलार्धातील सर्वांत मोठा दिवस आणि सर्वांत लहान रात्र असते. यापूर्वी १६२३ मध्ये हे दोन ग्रह एकमेकांच्या इतके जवळ आले होते. त्यानंतर आता थेट साठ वर्षांनी म्हणजे १५ मार्च २०८० रोजी ते पुन्हा खूप जवळ येणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील ही एकमेव संधी होती.

------------------------------------------------------

फोटो : २२१२२०२०-कोल-गुरु-शनी महायुती

(संदीप आडनाईक)