Navratri 2023: पाचव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपात खडी अलंकारिक पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 17:50 IST2023-10-19T17:47:49+5:302023-10-19T17:50:23+5:30
अमोल शिंगे जोतिबा : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपात खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली ...

Navratri 2023: पाचव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपात खडी अलंकारिक पूजा
अमोल शिंगे
जोतिबा: शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपात खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. आज सुमारे 50 हजार भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले. शनिवारी (दि. 21) श्री जोतिबाचा जागर होणार आहे.
आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिरातील नित्य धार्मिक विधी पार पडला. श्रींचा महाभिषेक झाल्यानंतर श्रींची कमळ पुष्पाच्या पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपातील खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. यानंतर धुपाराती सोहळा संपन्न झाला. या धुपाराती सोहळ्यावेळी श्रींचे पुजारी, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सर्व मनाचे गावकरी आणि सर्व देवसेवक उपस्थित होते.