उंबरवाडीचे जवान जोतीबा चौगुले शहीद ;उद्या अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 18:42 IST2019-12-16T18:41:39+5:302019-12-16T18:42:52+5:30

कोल्हापूर  : गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी येथील जवान हवालदार जोतीबा गणपती चौगुले (वय 37) हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर लष्करी ...

Jotiba Chougule martyr of Umberwadi; funeral tomorrow | उंबरवाडीचे जवान जोतीबा चौगुले शहीद ;उद्या अंत्यसंस्कार

उंबरवाडीचे जवान जोतीबा चौगुले शहीद ;उद्या अंत्यसंस्कार

ठळक मुद्देउंबरवाडीचे जवान जोतीबा चौगुले शहीद उद्या अंत्यसंस्कार

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी येथील जवान हवालदार जोतीबा गणपती चौगुले (वय 37) हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात त्यांच्या गावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासणे यांनी दिली.

शहीद जवान चौगुले यांचा 23 सप्टेंबर 1982 रोजी जन्म झाला होता. 5 एप्रिल 2002 रोजी ते सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुलगा अथर्व ( वय 9) मुलगा हर्षद (वय 3) असा परिवार आहे. उद्या त्यांचे पार्थिव येणार असून, त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: Jotiba Chougule martyr of Umberwadi; funeral tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.